मुंबई, 23 ऑगस्ट: मुंबईहून पुण्याला डेक्कन क्वीनमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाला पॅन्ट्री कारमधून मागवलेल्या ऑम्लेटमध्ये चक्क अळ्या सापडल्या. या प्रवाशानं ऑम्लेटचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. तर प्रवाशानं याबाबत त्यावेळी तक्रार केली असता कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन यावर नेमकी कोणती कारवाई करणार हे पाहाणं महत्वाचं आहे.