ग्राउंड रिपोर्ट.. नाशिकमधील घोटविहीराचं 'माळीण' होण्याची भीती, नागरिकांचे स्थलांतर

ग्राउंड रिपोर्ट.. नाशिकमधील घोटविहीराचं 'माळीण' होण्याची भीती, नागरिकांचे स्थलांतर

नाशिकच्या पेठ तालुक्यातील घोटविहीरा गावाच्या परिसरात भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. यामुळे या गावातील शेकडो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. घोटविहीराचं माळीण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ(प्रतिनिधी)

नाशिक, 6 ऑगस्ट- नाशिकच्या पेठ तालुक्यातील घोटविहीरा गावाच्या परिसरात भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. यामुळे या गावातील शेकडो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. घोटविहीराचं माळीण होण्याची भीती व्यक्त होत आहे. भूस्खलन आणि भूकंपाच्या धक्क्याने गावात जमिनीला ठिकठिकाणी तडे गेल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट कायम आहे.

नाशिकपासून 90 आणि पेठपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेले हे घोटविहीरा गाव..आणि याच गावातील हे शेकडो घरे ओस पडली आहेत. हे गाव ओस पडण्याला कारणही तितकेच भयावह आहे. या गावातील जमीन दर मिनिटाला इंच इंच खाली जात आहे. सोमवारी दुपारी अचानक या गावातील घरांमध्ये भांडे पडले आणि थरकाप उडवणारा आवाज झाला. नंतर गावकऱ्यांनी घराबाहेर येऊन पाहिलं तर डांबरी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याचे निदर्शानास आले. भूकंपामुळे गावात भूस्खलन होत असल्याची बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली.

घोटविहीरा गावातील लोकांनी ही बाब लागलीच स्थानिक पोलिसांना कळवली. नंतर हरसुल पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत घोटविहीराकडे धाव घेतली. गावातील ग्रामस्थाच्या बोलण्यात तथ्य असल्याचे कळताच पोलिसांनी रात्री 8 वाजता 2 ते 3 किलोमीटर डोंगराखाली असलेल्या उंबरमाळमधील 15 ते 20 घरातील शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पीडित नागरिकांना धीर देण्यात आला.

नाशिकच्या पेठ तालुक्यातील घोटविहीरा गावातील जमीन तासातासाला खाली सरकत असल्याने या गावाचे माळीण होण्याची भीती गावकऱ्यांना आहे. त्यामुळे इथले ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेऊन भीतीच्या वातावरणात गावात वास्तव्य करत आहे. घोटविहार गावाच्या खालील भागात असलेल्या उंबरमाळ पाड्यावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मात्र, गावकऱ्यांचे संसारउपयोगी वस्तू घोटविहीरा गावात आहे. गाव दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय तोडगा काढणार याचीच प्रतीक्षा गावकऱ्यांना आहे.

...अन्यथा तलवारींचा वापर करा, शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेना अध्यक्षांचं चिथावणीखोर भाषण VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 05:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading