यवतमाळ, 18 जानेवारी: यवतमाळ-तुळजापूर राज्य महामार्गावर कोसदानी घाटात मोठी दरड कोसळली. त्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली दरड अचानक कोसळल्यानं रस्त्यावर मलबा आला आहे. त्यामुळे यवतमाळ-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महत्त्वाची बाबा म्हणजे दरड कोसळताना कार येत होती.
ट्विटरवरील या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावरून भरधाव कार येत असताना अचानक दरड कोसळते आणि मलबा रस्त्यावर येतो. नशीब बलवत्तर म्हणून ती कार मलब्यासोबत रस्त्याच्या बाजूला जाते. थोडक्यासाठी त्या कारचालकाचा जीव वाचला आहे. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.
दरड कोसळत असताना सुदैवान कार आणि कारचालक बचावला आहे. कारला मलब्याचा धक्का लागल्यानं कार रस्त्याच्या बाजूला गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाच्या सुमारास यवतमाळपासून 60 किमी अंतरावर असणाऱ्या महामार्गावर घडली होती. त्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे.