• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • PHOTOS: माळशेज घाटात दरड कोसळली; कारचा चक्काचूर, वाहतुकीवर परिणाम

PHOTOS: माळशेज घाटात दरड कोसळली; कारचा चक्काचूर, वाहतुकीवर परिणाम

Landslide in Malshej Ghat: माळशेज घाटात दरड कोसळून दुर्घटना घडली आहे. एका कारवर ही दरड कोसळली आहे.

  • Share this:
मुरबाड, 11 जून: कल्याण-अहमदनगर महामार्गावरील (Kalyan Ahmednagar Highway) माळशेज घाटात (Malshej Ghat) दरड कोसळली (Landslide) आहे. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसात घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात आता माळशेज घाटात दरड कोसळून दुर्घटना घडली आहे. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. घाटातून जाणाऱ्या एका कारवर ही दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत गाडीचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. दरड कोसळ्यानंतर माळशेज घाट वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मुसळधार पावसाने घेतला चिमुकलीचा बळी गाड्या जाऊ शकतात इतकी एका लेनवरीस दरड बाजूला केली आहे. टप्प्या टप्याने दोन्ही बाजूच्या गाड्या सोडल्या जात आहे मात्र यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आधीच माळशेज घाटात रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते आणि त्यात आता दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी दाखळ झाले असून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Published by:Sunil Desale
First published: