भंडारा, 10 मे: सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगानं (Corona pandemic) वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्माचारी रात्रीचा दिवस करून आपलं कर्तव्य बजावत आहेत. अशा अवस्थेत कोविड सेंटरमध्ये विविध पदावर काम करणाऱ्या कोरोना वॉरियर्स तरुणींना बेघर (Corona warriors women become homeless) होण्याची वेळ आली आहे. तुम्ही कोरोना विषाणूचे वाहक असू शकता, असा आरोप करत घरमालकाने संबंधित तरुणींना घराबाहेर काढलं (landlord evicted them) आहे. तसेच त्याचं सामान रस्त्यावर फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी पीडित तरुणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या असता पोलिसांनीही त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही, असा आरोप पीडित तरुणींनी केला आहे. संबंधित घटना रविवारी सकाळी भंडारा शहरात घडली आहे. तर या सहा तरुणी मुळच्या अकोला येथील रहिवासी आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्या पटेलपुरा वॉर्डातील हिरणवार यांच्याकडे भाडे तत्त्वावर राहत होत्या. मात्र कोविड वॉर्डात काम करत असल्यानं घरमालकांनी त्यांना घराबाहेर काढलं आहे.
'तुम्ही कोविड वॉर्डात काम करता, वारंवार कोविड रुग्णांच्या संपर्कात राहता' त्यामुळे तुम्ही कोरोना विषाणूचे वाहक असून शकता. तुमच्यामुळे याठिकाणी कोरोना वाढू शकतो, असं म्हणतं घरमालकानं त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. एवढंच नव्हे तर त्यांनी संबंधित तरुणींचे सामानही रस्त्यावर फेकलं आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी घरमालकाने तरुणी ज्या खोलीत राहत होत्या तेथील पाणी पुरवठा आणि विद्युत पुरवठा देखील खंडीत केला होता.
हे ही वाचा-पुणे: कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांचा राडा; शिवीगाळ करत डॉक्टरासह नर्सला मारहाण
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेलं असता, त्यांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोपही या सहा तरुणींनी दिला आहे. तर दुसरीकडे, या घटनेबाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, संबंधित सहा तरुणी मला पोलीस ठाण्यात आम्हाला भेटल्या होत्या. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल न करता घरमालकाला तंबी द्यावी, अशी मागणी केली होती. आणि आता त्या माध्यमांसमोर जाऊन प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणींनी तक्रार दिल्यास घटनेची रितसर चौकशी करून योग्य ती कारवाई करू असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Corona spread