राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांवर जमीन फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांवर जमीन फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर एकाच तालुक्यात दोन ठिकाणी जमिन फसवणूकीचे दोन गुन्हे दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

रायचंद शिंदे शिरुर 16 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर जमिन फसवणूकीचा आता दुसरा गुन्हा दाखल झालाय. दिव्यांग महिला व बादल यांच्या मित्राच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झालाय. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडालीय.

पुणे जिल्ह्यात राजकारणात मंगलदास बांदल वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले होते. शिरुर लोकसभा मतदार संघात ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार होते मात्र ऐनवेळी त्यांची संधी नाकारली अन बांदलांना निवडणुक निकालानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.

तिने मुलांना कुशीत घेतल्याने मुलं बचावली पण तिचा मात्र जीव गेला

8 जुलै रोजी शिरुर पोलिसांनी जमीन फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल झाला. तर्डोबाची वाडी येथे 2008 साली आशा पाचर्णे या महिलेशी 10 एकर जमीनीचा 90 लाख रूपयांना व्यवहार केला मात्र जमीन मालक महिलेला पैसेच दिले नाही. गोरगरीब नागरिक अडीअचणींच्या काळात वडिलोपार्जित जमीन विक्रीला काढतात मात्र  अडीअडचणीत असताना राजकिय नेत्यांकडुनच गोरगरीबांची फसवणूक होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे बांदल यांच्या अडचणीत दुसऱ्या गुन्ह्याची सोमवारी भर पडलीय. औद्योगिक वसाहत असणाऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने टोळी रुपात सक्रिय होऊन दमदाटी करुन फसवणुक केली जात असेल तर मोका अंतर्गत कारवाईचे संकेत पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.

फक्त 8 मिनिटांच्या अ‍ॅक्शन सीनसाठी प्रभासवर खर्च केले तब्बल एवढे कोटी

बांदल यांनी पुणे नगर महामार्गालगत 2001 साली खंडाळे गावच्या हद्दीत किशोर देशमुख यांची 21 गुंठे जमिनीचा 27 लाख रूपयांना व्यवहार करत ती जमीन आपल्या मित्राच्या नावे खरेदी केली परंतु बांदल यांनी जमीन मालक देशमुख यांना वारंवार पैसे देतो देतो असे सांगून टाळाटाळ करत  27 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप दुसऱ्या गुन्ह्यात बांदलांवर ठेवण्यात आला आहे

मात्र या दोन्ही थेट संबंध नसून राजकीय सुडापोटी माझ्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याचं मंगलदास बांदल यांनी सांगितलं. मी जनतेतून घडलेला कार्यकर्ता आहे असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर एकाच तालुक्यात दोन ठिकाणी जमिन फसवणूकीचे दोन गुन्हे दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

First published: July 16, 2019, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading