मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Lalbaugcha Raja : लालबागच्या राज्याच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव, एक किलो मोदकाला सव्वा कोटी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राज्याच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव, एक किलो मोदकाला सव्वा कोटी

मागच्या आठवड्यात गणरायाला आपण निरोप दिला मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणपती उत्सव थाटामाटात साजरा करता न आल्याने यंदा जोरदार स्वागत करण्यात आले. (Lalbaugcha Raja)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 16 सप्टेंबर : मागच्या आठवड्यात गणरायाला आपण निरोप दिला मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणपती उत्सव थाटामाटात साजरा करता न आल्याने यंदा जोरदार स्वागत करण्यात आले. (Lalbaugcha Raja) दरम्यान कोरोनाचे निर्बंध हटवल्याने मानाच्या गणपतींचे दर्शनही खुले करण्यात आले होते. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भावीकांनी हजेरी लावली. या दरम्यान कित्येक भक्तांनी गणपतील दान स्वरुपात वस्तू दिल्या. त्या वस्तूंचा काल लिलाव करण्यात आला. या वस्तूंचा लिलाव कोट्यावधी किमतीच्या घरात गेला.

लालबागच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव काल (दि. 15) करण्यात आला. जमा झालेल्या वस्तूंमध्ये एकूण एक कोटी तीस लाख रुपयांचा लिलाव झाला. लालबागच्या राजाच्या दानपेटीत दहा दिवसात पाच कोटींचे दान जमा झाले होते. त्यात सोन्या चांदीच्या वस्तूंसहसह एक हिरो होंडाची बाईक देखील दान करण्यात आली होती. या वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे.

हे ही वाचा : #कायद्याचंबोला: पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडणे महागात! ग्राहकाला 30 हजार नुकसान भरपाई

काल संध्याकाळी लालबागच्या राज्याच्या वस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला तो रात्री दहा पर्यंत सुरू ठेवण्यात आला होता. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या साहित्याच्या लिलावासाठी 200 भक्तांनी हजेरी लावली आणि वस्तू विकत घेतल्या. या लिलावात सोन्याचा मोदक सव्वा किलोचा होता, त्यासाठी 60 लाख 3 हजार रुपयांची बोली लावत एका महिलेने घेतला. हार साडे सतरा तोळ्याचा होता, साडे आठ लाख रुपये किमतीला एका भक्ताने तो विकत घेतला. तसेच एक दुचाकी होती ती 66 हजार बोली लावून एका भक्ताने विकत घेतली.

यंदा 14 किलो 433 ग्रॅम चांदी आणि 3 किलो 673 ग्रॅम सोन्याच्या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये मोदक, हार, फूल, मूर्ती, गदा, चैन अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंचा समावेश होता.

हे ही वाचा : गणपतीनंतर दिवाळीही जोरात! मुख्यमंत्र्यांची मुंबईबाबत मोठी घोषणा

यातील आकर्षण म्हणजे एक किलोपेक्षा जास्त वजनाची लालबागचा राजाची मूर्ती, ज्यावर हिरा लावलेला होता ती. याशिवाय एक किलो वजनाचं सोन्याचं चॉकलेट, एका सोन्याच्या बिस्किटाचाही लिलाव करण्यात आला.

First published:

Tags: Festival, Ganesh chaturthi, Mumbai