मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वंचित आघाडीत उभी फूट, लक्ष्मण मानेंचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप

वंचित आघाडीत उभी फूट, लक्ष्मण मानेंचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप

 प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे.

मुंबई, 4 जुलै : 'वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत आहे. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली आहे,' असं म्हणत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे.

'लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे भाजपला 10 मिळाला. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे प्रतिगामी शक्तींचाच फायदा होत आहे. आता विधानसभा निवडणुकीतही आंबेडकर तीच भूमिका घेऊन पुढे चालले आहेत. हा पक्ष आता वंचितांचा राहिला नसून त्यामध्ये आरएसएसच्या लोकांनीच घुसखोरी केली आहे,' असं म्हणत लक्ष्मण मानेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना लक्ष्मण माने यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

वंचितमध्ये उभी फूट

'हा पक्ष उभा करण्यासाठी आम्हीही परिश्रम घेतले आहेत. आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. आम्ही हा पक्ष नव्याने उभा करू. आमची वेगळी वाटचाल करू. प्रकाश आंबेडकरांनी आमचा वापर केला. त्यांच्याद्वारे अजूनही भारिपचं काम सुरू आहे,' असा आरोप लक्ष्मण मानेंनी केला आहे.

विधानसभेसाठी काय आहे वंचितची भूमिका?

'विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही 40 जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागांवर निवडणूक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या 10 दिवसांत उत्तर द्यावे,' अशी भूमिका वंचितने घेतली आहे. वंचित आघाडीच्या या भूमिकेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

'वंचितसोबत आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचे नेते त्यावर चर्चा करतील. पण वंचितने दिलेली ऑफर म्हणजे भाजपला मदत करायची आहे का? असा प्रश्न पडतो. वंचित आमच्यासोबत आली नाही तर जनता ठरवेल की वंचित नेमकी कुणाची बी टीम आहे,' असं म्हणत काँग्रेस नेते आणि विधानसभेची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, वंचितच्या या फॉर्म्युल्यामुळे काँग्रेस मात्र चांगलीच अडचणीत सापडली आहे. कारण पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या वंचित आघाडीने थेट 248 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. तर काँग्रेसने फक्त 40 जागा लढवाव्यात, असं वंचितचं म्हणणं आहे.

सिंधुदुर्गात नितेश राणेंचा राडा; अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाचा VIDEO समोर

First published:
top videos