Home /News /maharashtra /

वाढदिवसालाच संपलं आयुष्य, राष्ट्रवादीच्या महिला सरपंचाने केली आत्महत्या

वाढदिवसालाच संपलं आयुष्य, राष्ट्रवादीच्या महिला सरपंचाने केली आत्महत्या

श्रीया या राष्ट्रवादीकडून रामपूर गावातील सरपंच आहेत. पण श्रीया आणि त्यांच्या पतीमध्ये सतत वाद होत होता.

    रत्नागिरी, 06 फेब्रुवारी : रत्नागिरीमध्ये गावच्या सरपंचानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरा-बायकोच्या भांडणातून बायकोने विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. चिपळूण तालुक्यातील रामपूर गावामधील घटना आहे. श्रीया रावराणे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे श्रीयां यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता. श्रीया या  राष्ट्रवादीकडून रामपूर गावातील सरपंच आहेत. पण श्रीया आणि त्यांच्या पतीमध्ये सतत वाद होत होता. वाढदिवसाच्या रात्रीदेखील त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर श्रीया यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी रात्री श्रीया आणि त्यांच्या पतीमध्ये भांडणं झाली. त्याचाच राग म्हणून त्यांनी विष प्यायलं. रात्री रागाच्या भरात उचललेल्या या पावलामुळे श्रीया यांचा जीव गेला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांकडून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून  श्रीया यांचा मृतदेह ताब्यात घेतला तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यात श्रेया यांनी विष प्यायल्याने त्यांचा जीव गेल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, या संदर्भात पोलिसांत प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अद्याप श्रेया यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाचा शोध घेत आहेत. गावच्या सरपंचाने अशी आत्महत्या गेल्यामुळे गावात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. पण पोलीस आता या प्रकरणाचा त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. तर श्रीया यांच्या जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. VIDEO : डेकोरेशनसाठी लावले होते फुगे, झाला भयंकर स्फोट  
    First published:

    Tags: Birthday, Lady sarpanch, Ratnagiri, Suicide

    पुढील बातम्या