न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट: 500 उठाबशांची शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेस अटक

न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट:  500  उठाबशांची शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेस अटक

कोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली होती. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता.

  • Share this:

14 डिसेंबर:  विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा सुनावणाऱ्या मुख्याध्यापिका  अश्विनी देवाण यांना अटक करण्यात आली आहे.आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अशी शिक्षा सुनावणाऱ्या या मुख्याध्यापिकेची बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली होती. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला 500 उठबशा काढण्याची शिक्षा सुनावली. 300 उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली होती. तिला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. सध्या तिच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे.तिला मानसिक धक्का बसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

काल ही बातमी पुढे आल्यानंतर या मुख्याध्यापिकेवर कारवाई करू असं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं होतं.त्यानुसार या मुख्याध्यापिकेचा  पगारही बंद करण्यात आला होता.

First published: December 14, 2017, 1:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading