VIDEO : कोकणातील धनगरवाडीत विदारक परिस्थिती, रस्त्याअभावी आजारी वृद्धेला तब्बल पाच किलोमीटर आणले डोलीतून
VIDEO : कोकणातील धनगरवाडीत विदारक परिस्थिती, रस्त्याअभावी आजारी वृद्धेला तब्बल पाच किलोमीटर आणले डोलीतून
रस्ताच नसल्यामुळे तेथील एका नव्वद वर्षाच्या आजारी वृद्धेला वाडीतील ग्रामस्थांनी तब्बल पाच किलोमीटर पारंपरिक पद्धतीने अक्षरशः डोली करून गावातील मुख्य रस्त्यावर आणण्यात आले.
रत्नागिरी, 5 ऑगस्ट : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. तर दुसरीकडे मूलभूत सुविंधाअभावी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्ताच नसल्यामुळे तेथील एका नव्वद वर्षाच्या आजारी वृद्धेला वाडीतील ग्रामस्थांनी तब्बल पाच किलोमीटर पारंपरिक पद्धतीने अक्षरशः डोली करून गावातील मुख्य रस्त्यावर आणण्यात आले.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मीर्ले-खोपी या धनगरवाडीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्ताच नसल्यामुळे तेथील एका नव्वद वर्षाच्या आजारी वृद्धेला वाडीतील ग्रामस्थांनी तब्बल पाच किलोमीटर पारंपरिक पद्धतीने अक्षरशः डोली करून गावातील मुख्य रस्त्यावर आणण्यात आले. ठमाबाई बाबा माने असे या 90 वर्षांच्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
कोकणातील धनगरवाडीत विदारक परिस्थिती, रस्त्याअभावी आजारी वृद्धेला तब्बल पाच किलोमीटर आणले डोलीतून pic.twitter.com/6Li5cEWNz0
त्यांना अशा प्रकारे डोलीतून गावातील मुख्य रस्त्यावरती आणून नंतर रुग्णालयात नेण्यात आले. खेड तालुक्यातील या धनगर वाडीमध्ये ही घटना घडली. मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावरती दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये ही वाडी वसली आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षातही या वाडीत जाण्यासाठी साधा रस्तादेखील बनवला गेला नाही.
...तरीही रस्ता नाही बनला -
आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एका बाजूला साजरा होत असताना या गावात मात्र अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या गावात जाण्यासाठी पाच किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला. मात्र, निधीअभावी हा रखडला असल्यामुळे रस्ता बनू शकला नाही.
हेही वाचा - Shashank Ketkar: 'चला चला विरोध करा...'; हर घर तिरंगा मोहिमेला शशांक केतकरनं दर्शवला विरोधमुख्यमंत्र्यांकडे मागणी -
एका बाजूला विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकारण्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी ही घटना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तरी याकडे गांभीर्याने पाहून कोकणातील धनगर वाड्यांचा विकासाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.