नागपूरात मृतदेह घेऊन थेट मॉलमध्येच आंदोलन!

नागपूरात मृतदेह घेऊन थेट मॉलमध्येच आंदोलन!

नागपूरात एम्रेस सिटी अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा करूण अंत झाला होता. भरपाई मिळावी यासाठी संतप्त नातेवाईकांनी मजुरांचे मृतदेह घेऊन थेट मॉलमध्येच आंदोलन केलं.

  • Share this:

नागपूर,ता.08 एप्रिल : रविवारचा दिवस असल्यानं आणि नागपूरच्या एप्म्रेस मॉलमध्ये  सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. पण तेवढ्यात मॉलमध्ये शनिवारच्या घटनेचे पडसाद उमटले. काल एम्रेस सिटी अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा करूण अंत झाला होता. यावेळी संतप्त नातेवाईकांनी मजुरांचे मृतदेह घेऊन थेट मॉलमध्येच आंदोलन केलं.

विहिरीतील विषारी वायूनेच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण हे तिनही कर्मचारी एम्प्रेस मॉल परिसरतील एम्प्रेस सिटी मध्ये कामावर असतांना एम्प्रेसच्या वतीने त्यांना कुठलीही भरपाई देण्यात न आल्याने हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान एम्प्रेस माल मध्ये रविवारी लोकांची गर्दी असतांना तीन मृतदेह नातेवाईक घेऊन आल्याने मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला.

First published: April 8, 2018, 8:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading