नडला की..,कोयता गँगने मुलाला बेदम मारहाण करून तोंडावर केलं मूत्रविसर्जन, VIDEO व्हायरल

कोयता गँगने एका तरुणाचे अपहरण केलं आणि नग्न करून कोयत्यासह बेल्टने अमानुष मारहाण केली.

कोयता गँगने एका तरुणाचे अपहरण केलं आणि नग्न करून कोयत्यासह बेल्टने अमानुष मारहाण केली.

  • Share this:
पुणे, 15 मार्च : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुळशी पॅटर्न सिनेमालाही लाजवेल असा प्रसंग पुण्यात घडला आहे. कोयता गँगने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केलं आणि नग्न करून कोयत्यासह बेल्टने अमानुष मारहाण केली. या गँगमधील तरुण एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडित मुलाच्या तोंडावर मूत्रविसर्जन करून माणुसकीला काळीमा फासली. हडपसर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. मन हेलावून टाकणारी घटना 12 मार्च रोजी मांजरी परिसरात घडली आहे. 16 वर्षीय मुलाला पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक कारणातून पीडित मुलाचा या गँगमधील तरुणांसोबत वाद झाला. त्यानंतर या गँगने कोयत्याचा धाक दाखवून रेल्वे स्टेशनच्या परिसरात नेलं. तिथे नेल्यावर या पाचही जणांनी या मुलाला बेल्टने मारहाण सुरू केली. या टोळक्याने या मुलाला अर्धनग्न केलं आणि लाथाबुक्याने आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. बेदम झालेल्या या मारहाणीत हा मुलगा अखेर बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतरही ही टोळकी इथं थांबली नाही. त्यांनी त्याच्या तोंडावर मूत्रविसर्जन केलं आणि पसार झाले. हा मुलगा दोन दिवसांपासून बेशुद्ध असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे.  या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या आरोपी तरुणांची ओळख पटवली आहे. हे सर्व जण कुख्यात गुन्हेगार असून कोयत्या गँगचे सदस्य आहे. या व्हिडिओच्या आधारे पाचही तरुणांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे. बारामतीत आलिशान BMW कार पेटली, फळ विक्रेत्याने वाचवला दोघांचा जीव इंदापूर  रस्त्यावर एका बीएमडब्यू या आलिशान गाडीने अचानक  पेट घेतला. फळविक्रेत्याच्या समयसुचक तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.बारामती येथील विशाल मदने राहण काटी ( ता. इंदापुर ) येथील नातेवाईक यांची भेट घेऊन बारामतीकडे निघाले होते. मदने BMW  या आलिशान गाडीतून चालकासह तिघेजण प्रवास करत होते. भवानीनगर इथं छत्रपती कारखान्याच्या प्रशासन इमारतीसमोर  फळं घेण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यावेळी फळविक्रेता मनोज ठेगंले यांनी गाडीतून धूर निघत आहे. 'तातडीने गाडीतून उतरा गाडीने पेट घेतला', असं जोर- जोरात ओरडले. मदने हे फळं घेण्यासाठी उतरले होते उर्वरित दोघे जण गाडीतच होते, गाडी पेटली आहे समजताच दोघे जण गाडीतून खाली उतरले. पुढच्या बाजूने गाडी पूर्ण पेटलेली होती. वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला. रस्त्यावर गाडी पेटली ही बातमी नजीकच हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती कारखान्यात समजली. तातडीने कारखान्याचा अग्निशमन गाडी येऊन  गाडी विझवली आणि मोठा अनर्थ ठळला. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडी पेटलेली परिसरात समजतात बघ्यांची मोठी गर्दी झाली यावेळी गाडी पूर्णपणे पुढच्या साईटने जळालेली आहे. फळ विक्रेत्यांनी दाखवलेली तत्परतेनं मदने परिवाराला तारले. 'वेळ आली होती मात्र, नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो फळविक्रेत्याच्या रूपाने देव आमच्यासाठी धावून आला,' असं डी.एम. मदने यांनी सांगितलं.
First published: