Home /News /maharashtra /

7 वर्षांत चला हवा येऊ द्या च्या सेट वर झालं नाही ते आज झालं! कोणती चूक कुशल बद्रिकेला पडली महागात?

7 वर्षांत चला हवा येऊ द्या च्या सेट वर झालं नाही ते आज झालं! कोणती चूक कुशल बद्रिकेला पडली महागात?

Chala Hawa Yeu dya: चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ पाडली आहे. थुकरटवाडीची ही टोळी विनोदाचा कहर मॅडनेस करते. कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा याच फळीतला एक विनोदवीर असून त्याने या कार्यक्रमाबद्दल केलेली Instagram Post वायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 21 मे- चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या मालिकेतून कुशल बद्रिके (Kushal Badrike) नावाचा अवली नट घराघरांत पोहोचला. कुशलच्या अफाट विनोदी टायमिंगमुळे तो कायमच कौतकाची थाप घेऊन जातो. कुशल बद्रिकेने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत त्याची चला हवा येऊ द्याच्या सेट वर झालेली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी चूक सगळ्यांना सांगितली आहे. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम महाराष्ट्राचं सात्यत्याने मनोरंजन करत आला आहे. कुशल बद्रिके विनोदाच्या मैदानावर उत्तम बॅटिंग करताना दिसतो. त्याच्या विडिओमुळे मात्र प्रेक्षक थोडे बुचकळ्यात पडले आहेत. काय आहे नक्की विडिओ मध्ये? कुशलने शेअर केलेल्या विडिओमध्ये तो एका पंजाबी माणसाची नक्कल करत आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेला (Shreya Bugde) त्याची खोडी काढायचा मोह आवरला नाही आणि तिने संहितेत नसलेलं वाक्य घेत कुशलला "तुम्ही हृषीकेश जोशी यांचे कोणी नाही ना?" असा प्रश्न केला. श्रेयाने चालू स्किट मध्ये टाकलेल्या या प्रश्नामुळे भूमिकेच्या बाहेर येऊन कुशल हसायला लागला आणि सगळ्या कलाकारांमध्ये आणि पाहुण्यांमध्येही हशा पिकाला. लाट बाई लाट पोळ्या लाट..! संजनाला स्वयंपाक येता नाही पण रूपालीला येतो, विश्वास नसेल तर हा VIDEO एकदा पाहाच श्रेया आणि कुशलची मैत्री सगळ्यांना माहित आहे. ऑफ स्क्रीन घट्ट मैत्री असलेले हे कलाकार ऑन स्टेज झालेल्या चुका जितक्या सावरून घेतात तितकीच एखादी चूक झाली तर त्यावर अचूक टायमिंगने एकमेकांचं गमतीशीर हसू करून बाजी सुद्धा मारतात. कुशलची श्रेयाने केलेली फजिती त्यांच्या उत्तम केमिस्ट्रीची मिसाल आहे.
  कुशलने या पोस्ट मध्ये म्हटलं आहे, गेल्या सात वर्षात हवा येऊ द्या च्या सेटवर माझ्याबरोबर असं काही घडलं नाही जे आज घडल. आमच्या चुका आणि आमची मापं काढण्याचा अधिकार घेऊन जन्माला आलेल्या “श्रेया बुगडे” हिने माझी एक चूक चालू स्किट मध्ये दाखवली (त्यात ती मापं काढायची राहिली नाहीच) आणि त्यानंतर जवळ जवळ सगळे मला कसं बोलायचं ते शिकवायला लागले, त्यात अंशुमन विचारे च्या तीन चार वर्षाच्या चिमुरडीने सुद्धा हात धुऊन घेतला. आता तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही मला… कुशलने आवर्जून सांगितल्याप्रमाणे सहकलाकार तर सोडाच पण पाहुणा म्हणून बसलेला अभिनेता अंशुमन विचारे आणि त्याच्या चिमुरड्या मुलीनेसुद्धा कुशलची मापं काढली.चला हवा येऊ द्या या मालिकेचं वेड सगळ्या महाराष्ट्राला आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी धमाल आणि जगावेगळा विचार करून निलेश साबळे आणि टीम प्रेक्षकांसमोर येत असतात. थुकरटवाडी आणि तिथले हे अजब रहिवासी दर आठवड्याला एका चित्रपटाचं त्यांनी केलेलं विनोदी ढंगातलं रूप आपल्याला दाखवतात.

  Cannesला पोहोचताच पूजा हेगडेसोबत घडलं असं काही.. म्हणाली, माझ्याकडे रडायलाही वेळ नव्हता

  कुशलसुद्धा वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतो. कुशलने साकारलेली फारुळे बाई आजही प्रेक्षकांना खळखळून हसवते. कुशल बद्रिके सोबतच श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, स्नेहल शिदम अशी ही निलेश साबळे यांनी एकत्र आणलेली टीम आहे. कितीही कठीण भूमिका असली तरी ती लीलया पेलण्यासाठी हे कलाकार ओळखले जातात. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम 2014 पासून झी मराठीवर सातत्य राखून आहे. प्रत्येक चित्रपटाचं प्रमोशन या कार्यक्रमात व्हावं अशी सगळ्या कलाकारांची इच्छा असते. या कार्यक्रमाचं वेड फक्त मराठी चित्रपटसृष्टी नाही तर बॉलिवूडला सुद्धा आहे. शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार अश्या अनेक बड्या कलाकारांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Chala hawa yeu dya, Marathi entertainment

  पुढील बातम्या