मुंबई, 30 ऑक्टोबर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील शिवसेनेच्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान भास्कर जाधव यांच्या कुडाळ पोलीस घरी जात नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुडाळ पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील निवासस्थानी जात 41(अ)अन्वये नोटीस बजावली आहे. तपासकार्यात सहकार्य करावे, नोटीसमधील नमूद अटी -शर्थीचे पालन करावे अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान यावर भास्कर जाधव काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भास्कर जाधव यांच्यावर पुण्यातही गुन्हा दाखल
सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिसांमध्ये योगेश अरुण शिंदे यांनी भास्कर जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन जाधव यांच्याविरोधात कलम 500, 501, आणि 502 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : 'तुम्ही राष्ट्रवादीशी आय लव्ह यू करता तेव्हा...'; शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळला, मंत्र्याचा आमदाराला टोला
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली. नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही.
भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भादरत होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत.
हे ही वाचा : नंदुरबारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गिरीश महाजनांची दांडी; राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा
मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhaskar jadhav, Narayan rane, Sindhudurg, Sindhudurg news