मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नारायण राणेंना पुन्हा एकदा धक्का; कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपद काँग्रेसकडे

नारायण राणेंना पुन्हा एकदा धक्का; कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपद काँग्रेसकडे

कुडाळ नगरपंचायतीच्या (Kudal Nagar Panchayat)  नगराध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं. आता त्याचा निकाल आला आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या (Kudal Nagar Panchayat) नगराध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं. आता त्याचा निकाल आला आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या (Kudal Nagar Panchayat) नगराध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं. आता त्याचा निकाल आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

सिंधुदुर्ग, 14 फेब्रुवारी: कुडाळ नगरपंचायतीच्या (Kudal Nagar Panchayat) नगराध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं. आता त्याचा निकाल आला आहे. कुडाळ नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. करोल यांना 9 मते तर भाजपच्या (BJP) प्राजक्ता बांदेकर यांना 8 मते पडली.अवघे दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाचा नगराध्यक्ष बनला आहे. तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे (Shivsena) मंदार शिरसाट यांची वर्णी लागली आहे.

कुडाळ मध्ये एकूण 17 पैकी 8 जागांवर भाजप ,7 जागांवर शिवसेना आणि 2 जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. कुडाळमध्ये कोणाचा नगरसेवक बसणार याबद्दल होती सर्वांना उत्सुकता होती. अखेर चमत्कार होईल हा भाजपचा दावा फोल ठरवत महाविकास आघाडीने कुडाळ मध्ये झेंडा रोवला आहे.

Breaking News: आमदार वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी सात नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला. जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी 2 भाजप तर दोन महाविकास आघाडीकडे आहेत.

तळकोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीनं एकत्र येऊन प्रतिष्ठेची असलेली कुडाळ नगरपंचायत आपल्या ताब्यात घेत राणेंना धक्का दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिष्ठेची नगराध्यक्ष निवडणूक होती. कुडाळमध्ये भाजप 8, शिवसेने 7 आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप सत्तेच्या जवळ असताना आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती.

First published:

Tags: BJP, Narayan rane, NCP, Shivsena, काँग्रेस