ktm duke वरून कॉलेजला चालले होते मित्र, वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुण जागीच ठार

ktm duke वरून कॉलेजला चालले होते मित्र, वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुण जागीच ठार

भिवंडी शहर परिसरात दोन वेगवेगळ्या झालेल्या वाहन अपघातात कॉलेज युवकासह पादचारी महिला कामगार जागीच ठार झाल्याची घटना घडली

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 15 जानेवारी : भिवंडी शहर परिसरात दोन वेगवेगळ्या झालेल्या वाहन अपघातात कॉलेज युवकासह पादचारी महिला कामगार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून एका ट्रक चालकास अटक केली आहे.

कालवार इथं ktm duke मोटार सायकलवरून जाणाऱ्या कॉलेज युवकांच्या बाईकला भरधाव अज्ञात वाहनाने  जोरदार धडक दिली, या अपघातात अमय अरुण पाटील या 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  तर त्याच्या पाठीमागे बसलेला मित्र प्रशांत संजय पाटील ( २१ ) हा अपघातामध्ये गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी काल्हेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. हे दोघेही अंजूरफाटा येथील चौघुले कॉलेजमध्ये १२ वीच्या वर्गात शिकत आहेत. ते दोघेही कॉलेजला जात असताना हा अपघात घडला आहे.

दुसरा अपघात तर दुसरा अपघात हा मुंबई नाशिक महामार्गावरील माणकोली ब्रिजजवळ झाला. गोदामात सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या महिलेस अंजूरफाट्याकडे वळण घेणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये अपघातात पादचारी कामगार महिला ताई पंडित देवकर ( ३५ रा.माणकोली ) ही जागीच ठार झाली.  या अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रक चालक शशिकांत पांडे ( ४५ ) यास अटक केली आहे.

बारामतीत सरपंचाच्या पतीवर सपासप वार करून संपवलं

बारामती तालुक्यातील सोनगाव येथील विद्यमान सरपंच जयश्री युवराज थोरात यांचे पती युवराज थोरात यांची आज दुपारी सोनेश्वर मंदिरजवळ  तरुणाने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. युवराज थोरात यांच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जोपर्यंत हत्या करणाऱ्या आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत  सदर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा नातेवाईकांनी पवित्रा घेतला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सोनेश्वर मंदिरात महिला पूजा करण्यासाठी येत होत्या. त्यावेळी मंदिराच्या परिसरात आरोपी महिलांना त्रास देत होता. त्यामुळे सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज थोरात यांनी या तरुणाला हटकले होते. त्याचा राग धरून त्याने या तरुणाने धारधार शस्त्राने  थोरात यांच्यावर सपासप वार करून हत्या केली. यात थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, सरपंच जयश्री  थोरात यांचे पती युवराज थोरात यांच्या हत्येमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी सोनगाव येथे राहत असणाऱ्या पारधी समाजाची दहा ते बारा घरे पेटवून दिल्या आहेत. जोपर्यंत हत्या करणाऱ्या आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत  सदर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा सरपंच यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bhiwandi
First Published: Jan 15, 2020 08:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading