..तर या 6 जिल्ह्यांना मिळणार नाही पाणी, सरकार ही योजना गुंडाळणार की काय!

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना रणजित आणि विजयसिंह या मोहिते पाटील पितापुत्रांनी या योजनेसाठीच भाजपमध्ये जात असल्याचं सांगितलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 09:33 PM IST

..तर या 6 जिल्ह्यांना मिळणार नाही पाणी, सरकार ही योजना गुंडाळणार की काय!

प्रफुल्ल साळुंखे (प्रतिनिधी),

मुंबई, 28 जून- पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद आणि बीड या सहा जिल्ह्यांना कृष्णा आणि कोयनेतून पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. राज्य सरकारने कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना गुंडाळली आहे. कृष्णा स्थिरीकरण हा प्रकल्प पूर्ण करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण, कृष्णा आणि कोयना या नद्यांमधील पाणी वळवता येणार नाही. तसं करायला कृष्णा पाणी तंटा लवादानं मनाई केली आहे. जोपर्यंत लवादाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प हाती घेता येणार नाही, असे महाजन यांनी सांगितले आहे. भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला गिरीश महाजन यांनी हे उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना रणजित आणि विजयसिंह या मोहिते पाटील पितापुत्रांनी या योजनेसाठीच भाजपमध्ये जात असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता मोहितेची कोंडी झाली आहे. कृष्णा-कोयनेचं पाणी तुट्याच्या खोऱ्यातल्या वळवण्यात येणार होते. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, बीड आणि उस्मानाबादकडे पाणी वळवणार होते. कृष्णा खोऱ्यातील कुंभी, कासारी, वारणा, कोयना आणि कृष्णेतून वळणार पाणी होते. सहा जिल्ह्यातल्या 31 तालुक्यात पाणी वळवायला 2004 मध्ये मंजुरी मिळाली होती. उजनीत कृष्णेचे पाणी आले असते. यामुळे 5 लाख 50 हजार 290 हेक्टर जमीन ओलीताखाली जाऊन सुजलाम सुफलाम झाली असती.

दरम्यान, आघाडीच्या काळातही या पाण्याकडं लक्ष देण्यात आले नाही. सध्या उजनी धरणातून 7 टीएमसी पाणी उस्मानाबाद आणि बिड जिल्ह्याकडे वळवण्यासाठी काम सुरु आहे. किमान 5 हजार कोटी रुपयांची गरज असलेल्या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी फक्त 10 हजार रुपयांची तरतूद करत आहे. बारामतीचे पाणी तोडून माढ्याकडे वळवून श्रेय घेत असताना ऐन निवडणूक तोंडावर 6 जिल्ह्याचा प्रकल्प गुंडाळल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी 'तो' ठरला देवदूत; VIDEO VIRAL

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2019 09:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...