मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोयना धरण 100 टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा! Video

कोयना धरण 100 टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा! Video

कोयना धरणात 105.25 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडण्यात आले आहेत.

कोयना धरणात 105.25 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडण्यात आले आहेत.

कोयना धरणात 105.25 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडण्यात आले आहेत.

सातारा, 22 सप्टेंबर : महाराष्ट्रासाठी वरदायिनी ठरणाऱ्या कोयना धरणाने शंभर टीएमसीचा टप्पा पार केला. यामुळे महाराष्ट्रातील उद्योग आणि कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. कोयना धरणात  105.25 टीएमसी इतका पाणीसाठा झाला. धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक व संपलेली साठवण क्षमता लक्षात घेता धरणाचे सहा वक्री दरवाजे बुधवारी दुपारी 2 वाजता एक फुटाने उचलण्यात आले. यातून 9 हजार 546 क्यूसेक व पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1 हजार 50 क्यूसेक असे प्रति सेकंद 10 हजार 596 क्यूसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर्व विभागातील नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने बहुतांशी ठिकाणी उघडीप दिली आहे. मात्र, अंतर्गत नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून प्रति सेकंद सरासरी 6 हजार 402 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आता पूर्ण क्षमतेचा म्हणजेच 105.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यापुढे पाणी सामावून घेण्याची क्षमता पूर्णपणे संपुष्टात आल्याने पुन्हा धरणाच्या सहा वक्री दरवाजातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. धरणाची सध्याची एकूण स्थिती उपलब्ध पाणीसाठा 105.25 टीएमसी, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 100.25 टीएमसी, पाणी उंची 2163.6 फूट, जल पातळी 659.435 मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणात प्रति सेकंद सरासरी 6 हजार 402 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे 4435 मिलिमीटर, नवजा 5391 मिलिमीटर व महाबळेश्वर येथे 5799 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 'लम्पी'मध्ये खासगी डॉक्टरांचे फावले, शेतकऱ्यांची सुरू आहे लूट! पाहा Video महाराष्ट्राला मोठा दिलासा पावसाळा सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे कोयना धरण कधी भरते याकडे लागते. कोयना धरणाच्या माध्यमातून सुमारे 2 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील जवळपास 67 टीएमसी पाण्याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जातो. तर राज्यातील पूर्वेकडे सिंचनासाठी 30 टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती व सिंचन अवलंबून आहे. त्यामुळेच तर कोयना धरणाला भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते. यावर्षी कोयना धरणात शंभर टक्के म्हणजेच 105.25 टीएमसी पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभर राज्याचा वीज व सिंचनाचा प्रश्न मिटला असल्याने महाराष्ट्र राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
First published:

Tags: Rain, Satara, Satara news, कोयना धरण, पाऊस, सातारा

पुढील बातम्या