• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मित्राच्या मदतीनं ड्रायव्हरनं पळवली 4 कोटींच्या रोकडसह एटीएम व्हॅन, अखेर...

मित्राच्या मदतीनं ड्रायव्हरनं पळवली 4 कोटींच्या रोकडसह एटीएम व्हॅन, अखेर...

पळवून नेलेली एटीएम व्हॅन पोलिसांना कल्याण फाट्यावर सापडली होती, पण...

  • Share this:
विरार, 19 नोव्हेंबर: दिवाळीच्या (Diwali) पूर्वसंध्येला अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका एटीममध्ये रोकड भरण्यासाठी आलेल्या व्हॅनचा चालक एटीएम व्हॅन (ATM Van)घेवून पळाल्याची घटना समोर आली होती. तब्बल आठ दिवसांनी या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 कोटी 28 लाख, 70 हजार 100 रुपये हस्तगत केले आहेत. दरम्यान, एटीएम व्हॅन कल्याण फाट्याजवळ भिवंडी परिसरात एका निर्जनस्थळी आढळून आली होती. हेही वाचा..संजय राऊतांची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास हरवलेली, प्रवीण दरेकरांनी केला पलटवार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायटर बिझनेस कंपनी ठाणे यांची गाडी गुरवारी सायंकाळी 5 च्या सुमारास विरार पश्चिम बोळींज येथे असलेल्या महिंद्रा कोटक बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी होती. यात दोन सुरक्षारक्षक आणि मदतनीस होता. यावेळी एटीएम सेंटरजवळ व्हॅन उभी असताना चालक रोहित बबन आरु हा सुरक्षारक्षक आणि मदतनीस एटीएम मशीन उघडण्यास व्यस्त असताना व्हॅन घेऊन पसार झाला होता. आरोपी चालक रोहित हा चेंबूर येथे राहणारा असून तो 3 महिन्यांपूर्वीच अक्षरा टूर् अॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीत कामाला लागला होता. त्याने पळवून नेलेली एटीएमची व्हॅन पोलिसांनी कल्याण फाट्यावर जप्त केली होती. त्यात 2 कोटी 33 लाख रुपये आढळले होते. पुढील तपासात पोलिसांना यात नवी मुंबई येथील अक्षय प्रभाकर मोहिते (वय 24) हा सुद्धा सामील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेताच त्याने रोहित अहमदनगर येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला असल्याचे समजले. माहितीनुसार पोलिसांची दोन पथके अहमदनगर येथे रवाना झाली आणि त्यांनी सापळा रचून रोहितला अटक केले. यात आणखी एक साथीदार असल्याचे समोर आले. पोलिसांनी तीनही आरोपीला अटक केले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली 100 टक्के रक्कम हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त (मीरा भाईंदर-वसई-विरार) संजयकुमार पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, विरार पश्चिमेकडील बोळींज भागात गुरुवारी 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. नेहमीप्रमाणे कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी व्हॅन आली होती. पण, गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली. बॉडीगार्ड आणि मॅनेजरने जोरात आरडाओरडा केला. पण, चालकाने वेगाने निघून गेला होता. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल मॅनेजरने आपल्या बँक व्यवस्थपकाला याची माहिती दिली. हेही वाचा...बसमध्ये ओळख झालेल्या महिलेने 4 महिन्याचे बाळ पळवले, पुण्यातील खळबळजनक घटना बँकेनं तातडीने याबद्दल विरार पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली होती.
Published by:Sandip Parolekar
First published: