मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेना आमदाराने केलं Narendra Modi अन् Devendra Fadnavis यांच्या कामाचे कौतुक

शिवसेना आमदाराने केलं Narendra Modi अन् Devendra Fadnavis यांच्या कामाचे कौतुक

...अन् शिवसेनेच्या आमदाराने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांच्या कामाचे कौतुक (नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस फाईल फोटो - पीटीआय)

...अन् शिवसेनेच्या आमदाराने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांच्या कामाचे कौतुक (नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस फाईल फोटो - पीटीआय)

Shiv Sena MLA praised Modi Fadnavis: पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन झाल्यावर शिवसेना आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

सातारा, 20 ऑक्टोबर : सातारा जिल्ह्यातील (Satara district) जिहे कटापूर या पाणी योजनेचे (Jile Katapur water supply) शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले आहे. शिवसेना आमदाराने भाजप नेत्यांचे कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत यासोबतच विविध चर्चांनाही उधाण आले आहे.

सातारा जिल्ह्यातील खटाव हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिहे काटापूर ही योजना राबवण्याचे ठरवले. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या योजनेचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी उद्घाटन केले. यावेळी आमदार महेश शिंदे यांनी म्हटलं, जिहे कटापूर या योजनेचा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्गी लागली आहे. ही य़ोजना आमच्यासाठी फलदायी ठरणार आहे.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पाण्याची कमतरता असल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. टँकरने सुरू असलेला पाणी पुरवठा बंद करुन सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी जिहे कटापूर योजना तयार करण्यात आली आहे.

वाचा : काँग्रेसमध्ये दिवाळीपूर्वीच फुटले फटाके, सचिन सावंतांनी दिला प्रवक्तेपदाचा राजीनामा

शशिकांत शिंदे यांच्याकडून टीका

जिहे कटापूर पाणी पुरवठा योजनेचं कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली. आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं, शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना कृष्णा खोरे विकास महामंडळ बनले. यामुळे जिहे कटापूर योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची माझ्यासह अनेकांची इच्छा होती. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जर आपुलकी असले तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांचे नाव या योजनेला द्यायला हवे.

या योजनेला अद्याप केंद्रीय जलआयोगाकडून निधी देतो असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते पण तो निधी मिळालाच नाही. या संदर्भात गेल्या महिन्यात केंद्रीय जलआयोगाकडे प्रस्ताव पाठवला आहे मात्र, अद्यापही मंजुरी मिळाली नाहीये असंही शशिकांत शिंदे म्हणाले.

या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्याचे ठरले होते. मात्र श्रेय घेण्यासाठी काहींनी हे उद्घाटन करुन टाकल्याचं म्हणत शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, Narendra modi, Shiv sena