कोपर्डीची 'निर्भया' एक वर्षानंतरही न्यायाच्या प्रतिक्षेत, पीडितेचं स्मारक नाही तर समाधी !

कोपर्डीची 'निर्भया' एक वर्षानंतरही न्यायाच्या प्रतिक्षेत, पीडितेचं स्मारक नाही तर समाधी !

कोपर्डीतल्या पीडितेच्या घरासमोर तिचं स्मारक बांधण्यात आलं आहे. पण संभाजी ब्रिगेडने स्मारकाला विरोध करताच हे पीडितेचं स्मारक नसून समाधी आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या कुटुंबियांनी दिलीय.

  • Share this:

कोपर्डी, 15 जुलै : महाराष्ट्राचं सामाजिक जीवन ढवळून काढणाऱ्या कोपर्डी अत्याचार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालं. यावेळी कोपर्डीतल्या पीडितेच्या घरासमोर तिचं स्मारक बांधण्यात आलं आहे. पण संभाजी ब्रिगेडने स्मारकाला विरोध करताच हे पीडितेचं स्मारक नसून समाधी आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या कुटुंबियांनी दिलीय.

भैय्यूजी महाराज यांचा सूर्योदय परिवार आणि पीडितेच्या कुटुंबाकडून ही समाधी उभारण्यात आलीय. राज्यभरातून आलेल्या शेकडो आंदोलकांनी पीडितेच्या समाधीचं दर्शन घेतलं. खेदाची बाब म्हणजे आज वर्षभरानंतरही कोपर्डी अत्याचारातील नराधमांना शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. त्याचबरोबर या खटल्याचं कामही अद्याप फास्टट्रॅक कोर्टाकडे वर्ग करण्यात आलेलं नाही.

याचाच निषेध म्हणूनच आज राज्यभरात राष्ट्रवादीनं निषेध आंदोलन केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली जळगावात मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आणि चित्रा वाघ सहभागी झाल्या होत्या. तर पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.

संभाजी ब्रिगेडनेही पुण्यात कोपर्डी अत्याचाराचा निषेध करण्यात आला. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीलाही कोपर्डीच्या घटनेनंतरच एकमुखी आवाज मिळाला होता. पण एक वर्ष उलटूनही ना कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळालाय ना मराठा समाजाला आरक्षण मिळालंय.

कोपर्डी घटनेनंतर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाले होते. त्यात अॅट्रासिटी कायद्यात बदल करण्याची मागणी केली गेली त्याला प्रत्युत्तर म्हणून दलित संघटनांकडून संविधान मोर्चे काढण्यात आले. एकूणच कोपर्डी अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातली जातीय सलोख्याची वीण काहिसी उसवली गेल्याचं बघायला मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 06:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading