मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनचे चाक घसरले

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनचे चाक घसरले

Railway

Railway

घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तत्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे.

रत्नागिरी, 26 जून : कोकण रेल्वेच्या (kokan railway) मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान राजधानी एक्स्प्रेसला (engine wheel of rajdhani express slipped) अपघात झाला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राजधानी एक्स्प्रेस रुळावरून घसरले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे सेवा पूर्वपदावर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

ही घटना आज सकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी ट्रेन धावत होती.  राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरून उतरले, त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक थांबली आहे. या मार्गावरून येणाऱ्या गाड्या एकापाठोपाठ थांबलेल्या आहे.

युवकानं भररस्त्यात नागरिकांवर केला चाकू हल्ला; तिघांचा मृत्यू, पाहा थरारक VIDEO

घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तत्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे.  या अपघातामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या गाड्या थांबल्यात

दरम्यान, एकीकडे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. चिपळूणमधील वशिष्ठी नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे मार्गावर वाहनांची मोठी रांगा लागल्या आहे. विकेंडला कोकणात आलेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Railway accident