Konkan Election Result 2019 LIVE : कुडाळमध्ये सेनेचं वर्चस्व कायम, वैभव नाईक बहुमतांनी विजयी!

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतप्रमाणं यावेळीही कुडाळ विधानसभा मतदार संघांवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 01:08 PM IST

Konkan Election Result 2019 LIVE : कुडाळमध्ये सेनेचं वर्चस्व कायम, वैभव नाईक बहुमतांनी विजयी!

कुडाळ, 24 ऑक्टोबर : कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकून 24 सीटसाठी मतदान झालं. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतप्रमाणं यावेळीही कुडाळ विधानसभा मतदार संघांवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी विजय घोडदौड कायम राखली आहे.

शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांच्या विरुद्ध भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांनी निवडणुक लढवली होती. मात्र वैभव नाईक यांनी रणजित देसाई यांना मात देत बहुमतांनी विजय मिळवला. याआधी 2014 च्या विधानसभा लढतीत वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे कुडाळ विधानसभा मतदार संघ चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा विजयाची पुनरावृत्ती करण्यात वैभव नाईक यशस्वी ठरले.

कोकणातील लक्षवेधी लढती

रायगड- श्रीवर्धन – विनोद घोसाळकर (शिवसेना) vs अदिती तटकरे (राष्ट्रवादी)

रत्नागिरी : उदय सामंत (विजय निश्चित) vs सुदेश मयेकर

Loading...

दापोली – योगेश कदम (शिवसेना) vs संजय कदम (राष्ट्रवादी)

गुहागर – भास्कर जाधव (शिवसेना) vs सहदेव बेटकर (राष्ट्रवादी)

कणकवली – नितेश राणे (भाजप) vs सतीश सावंत (शिवसेना)

वैभव नाईक विरुध्द रणजीत देसाई ( अपक्ष / भाजपा पुरस्कृत )

सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना) vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी) vs राजन तेली (भाजप बंडखोर)

पालघर – श्रीनिवास वनगा (शिवसेना) vs योगेश नम (काँग्रेस)

बोईसर – विलास तरे (शिवसेना) vs राजेश पाटील (बविआ)

नालासोपारा – प्रदीप शर्मा (शिवसेना) vs क्षितिज ठाकूर (बविआ)

वसई – विजय पाटील (शिवसेना) vs हितेंद्र ठाकूर (बविआ)

2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपला 24 पैकी 05 जागा तर शिवसेनेला 09 जागा मिळाल्या होत्या. या वर्षी मतदानोत्तर चाचणीत भाजप- सेना युतीला 21 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यात शिवसेनेला 14 आणि भाजपला 07 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आघडीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्षच्या खात्यात 1 जागा पडण्याची शक्यता आहे.

2014 निवडणूक

शिवसेना 09

भाजप 05

एनसीपी 04

बहुजन विकास आघाडी 03

शेकाप 02

कांग्रेस 01

2009 निवडणूक

शिवसेना 04

भाजप 03

एनसीपी 06

कांग्रेस 03

बहुजन विकास आघाडी 02

शेकाप 03

अपक्ष 03

==============================================

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 01:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...