रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का, सेनेचे उमेदवार उदय सामंत यांचा दणदणीत विजय

रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का, सेनेचे उमेदवार उदय सामंत यांचा दणदणीत विजय

शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांचा रत्नागिरी मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय.

  • Share this:

रत्नागिरी, 24 ऑक्टोबर: कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकून 24 सीटसाठी मतदान झालं. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेनं कोकणात आपलं वर्चस्व राखलं होतं. त्याच प्रमाणे यंदाही शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांना रत्नागिरी मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यात यश मिळालं आहे. उदय सामंत यांचा विजय आधीच निश्चित असल्याच्याही चर्चा होत्या. रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुदेश मयेकर विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत अशी लढत होती. जनतेनं उदय सामंत यांना कौल दिला आहे.

उदय सामंत हे आतापर्यंत 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता उदय सामंत यांची ही चौथी टर्म असणार आहे. याधी 2 टर्म राष्ट्रवादीकडून त्यानंतर त्यांनी 2014 साली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि 2014साली पुन्हा एकदा आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 9 खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. याशिवय रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. ग्रामीण भागात वाडीजोड रस्ते, महामार्गाला गावे जोडणारे प्रमुख रस्ते, परचुरीसारखे मोठे पूल, साकव, वाडीवाडीतील नळपाणी योजना इत्यादी जीवनावश्यक कामे त्यांनी केली आहेत. आघाडीतील चित्र मात्र म्हणावे तसे उत्साहवर्धक नाही. जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसकडे कोणी नेताच न उरल्याने कार्यकर्तेही नाहीत, आणि जे आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. आघाडीच्या उमेदवारापेक्षा उदय सामंत यांचं पारडं जड होतं. उदय सामंत यांची वैयक्तिक मतं, शिवसेनेचं पारंपारिक बळ, आघाडीचा गलितगात्र कारभार यामुळे शिवसेनेला त्यांचा गड कायम राखण्य़ात यश मिळालं आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपला 24 पैकी 05 जागा तर शिवसेनेला 09 जागा मिळाल्या होत्या. या वर्षी मतदानोत्तर चाचणीत भाजप- सेना युतीला 21 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यात शिवसेनेला 14 आणि भाजपला 07 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आघडीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्षच्या खात्यात 1 जागा पडण्याची शक्यता आहे.

2014 निवडणूक

शिवसेना 09

भाजप 05

एनसीपी 04

बहुजन विकास आघाडी 03

शेकाप 02

कांग्रेस 01

2009 निवडणूक

शिवसेना 04

भाजप 03

एनसीपी 06

कांग्रेस 03

बहुजन विकास आघाडी 02

शेकाप 03

अपक्ष 03

LIVE VIDEO : अजितदादांच्या जल्लोषात पत्नी सुनेत्रा पवार सहभागी, कुटुंबावर टीका करणाऱ्यांना सुनावले

First published: October 24, 2019, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading