साताऱ्यात उदयनराजेंना धक्का, उदयनराजेंची 'या' आमदारानं कॉपी केली स्टाईल

साताऱ्यात उदयनराजेंना धक्का, उदयनराजेंची 'या' आमदारानं कॉपी केली स्टाईल

नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी शिवसेनेला धक्का देत दणदणीत विजय मिळवला आहे.

  • Share this:

कणकवली, 24 ऑक्टोबर: भाजपचे नेते नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी शिवसेनेला धक्का देत दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांचा पराभव करत नितेश राणेंनी कणकवली-देवगड मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवला. यावेळी जल्लोष साजरा करताना नितेश राणेंनी उदयनराजेंची कॉलर स्टाईल कॉपी केल्याचं पाहायला मिळालं. उदयनराजेंच्या कॉलर स्टाईलवरुन निवडणुकीआधी बरेच वाद झाले होते. उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यातील पोटनिवडणुकीत जवळपास पराभव निश्चित झाला आहे. साताऱ्यातच नाही तर उदयनराजेंच्या कॉलर स्टाईलवर विरोधकांनाही बोलावं लागलं होतं.

नितेश राणे यांनी कणकवली देवगड मतदारसंघातून बहुमत मिळवत भाजपचा झेंडा फकवला. नितेश राणेंनी यावेळी जल्लोष करताना आपली कॉलर टाईट केली आहे.नितेश राणे यांनी शिवसेनेला आणखी चांगला उमेदवार द्यावा, असं आव्हानच दिलं. यावेळी निलेश राणे यांनी जोरदार जल्लोष केला. कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकूण 24 सीटसाठी मतदान झालं. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेनं कोकणात आपलं वर्चस्व राखलं होतं. त्यामुळे यावेळीही कोकणचा गड राखण्यात शिवसेना यशस्वी ठरणार का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपला 24 पैकी 05 जागा तर शिवसेनेला 09 जागा मिळाल्या होत्या. या वर्षी मतदानोत्तर चाचणीत भाजप- सेना युतीला 21 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यात शिवसेनेला 14 आणि भाजपला 07 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आघडीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्षच्या खात्यात 1 जागा पडण्याची शक्यता आहे.

2014 निवडणूक

शिवसेना 09

भाजप 05

एनसीपी 04

बहुजन विकास आघाडी 03

शेकाप 02

कांग्रेस 01

2009 निवडणूक

शिवसेना 04

भाजप 03

एनसीपी 06

कांग्रेस 03

बहुजन विकास आघाडी 02

शेकाप 03

अपक्ष 03

LIVE VIDEO : अजितदादांच्या जल्लोषात पत्नी सुनेत्रा पवार सहभागी, कुटुंबावर टीका करणाऱ्यांना सुनावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 03:40 PM IST

ताज्या बातम्या