Konkan Election Result 2019 LIVE : कणकवली विधानसभा मतदार संघातून नितेश राणे आघाडीवर

Konkan Election Result 2019 LIVE : कणकवली विधानसभा मतदार संघातून नितेश राणे आघाडीवर

नितेश राणे आणि शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांच्यातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकून 24 सीटसाठी मतदान झालं. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेननं कोकणात आपलं वर्चस्व राखलं होतं. मात्र यंदा नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हे चित्र पलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मागच्या वेळ प्रमाणे यावेळीही शिवसेना गड राखणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मत मोजणीला सुरुवात झाली असून कोकणातील कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजप उमेदवार नितेश राणे आघाडीवर आहेत. दरम्यान नारायण राणे शिवसेनेत असल्यापासून कोकणातील कणकवली विधानसभा मतदार संघ हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि या ठिकाणी भाजप-शिवसेना युती झालेली नाही. त्यामुळे नारायण राणे पुत्र नितेश राणे आणि शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांच्यातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

=============================================

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 08:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading