Konkan Election Result 2019 LIVE : नालासोपाऱ्यात शिवसेनेचा राजकीय 'एन्काउंटर'

नालासोपारा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे प्रदीप शर्मा विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्यावर सर्वांचं लक्ष लागलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 04:10 PM IST

Konkan Election Result 2019 LIVE : नालासोपाऱ्यात शिवसेनेचा राजकीय 'एन्काउंटर'

नालासोपारा, 24 ऑक्टोबर : कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकून 24 सीटसाठी मतदान झालं.दरम्यान नालासोपारा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे प्रदीप शर्मा विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्यावर सर्वांचं लक्ष लागलं होतं.

बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. तर शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा पिछाडी गेले आणि अखेरपर्यंत ही पिछाडी त्यांना भरुन काढता आली नाही. निवडणुकांआधी झालेल्या प्रचार सभांमध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ही लढत अतिशय चुरशीची मानली जात होती. पण अखेर बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर या मतदार संघात आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी ठरले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बविआचे क्षितिज ठाकूर यांनी 1 लक्ष 13 हजार 566 मते मिळवून भाजपच्या राजन नाईक यांचा पराभव केला होता. नाईक यांना 59 हजार 67 मते मिळाली होती. शिवसेनेच्या शिरीष चव्हाण यांना तिसर्‍या क्रमांकाची 40 हजार 321 मते मिळाली. पुन्हा 2018 च्या लोकसभा निवडणूकीत बविआच्या उमेदवाराला येथून सर्वाधिक मते मिळाली व दुसर्‍या क्रमांकावर भाजप राहिली तर सेना तिसर्‍या क्रमांकावर राहिली. भाजप सेनेच्या एकत्रित मतांपेक्षा बविआची मते अधिक होती. 2019 च्या निवडणूकीत मात्र या मतदारसंघातून सेना भाजप उमेदवाराने तब्बल 25 हजार 535 अधिक घेतली होती.

दरम्यान 2014च्या विधानसभेप्रमाणेच यंदाही जनतेचा कौल हा महायुतीला असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. कोकणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ होण्याची चिन्हं आहेत.

==============================================

Loading...

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...