Konkan Election Result 2019 LIVE : पालघरमध्ये श्रीनिवास वनगांनी उधळला गुलाल, काँग्रेसला धक्का

श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 01:58 PM IST

Konkan Election Result 2019 LIVE : पालघरमध्ये श्रीनिवास वनगांनी उधळला गुलाल, काँग्रेसला धक्का

पालघर, 24 ऑक्टोबर : कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकून 24 सीटसाठी मतदान झालं. पालघर जिल्हा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी विजय मिळवला आहे. श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र आहेत.

पालघर जिल्हा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विरुद्ध काँग्रेसचे योगेश नम यांच्यात लढत होती. मात्र जनतेचा कौल शिवसेनेला मिळाला आणि पालघरमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनी विजयी गुलाल उधळला.

2014 च्या निवडणूकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे लढविल्यानंतर दोघांची जिल्ह्यातील ताकद स्पष्ट झाली होती. त्यावेळी जिल्ह्यातून भाजपचे डहाणू व विक्रमगड मतदारसंघातून अनुक्रमे पास्कल धनारे व विष्णू सवरा निवडून आले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात मतदारसंघात झालेल्या दुर्लक्षामुळे आणि भाजपच्या अंतर्गत बंडखोरीतून लोकसभा निवडणूकीत या दोन्ही मतदारसंघातून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आघाडी मिळाल्यामुळे हे मतदारसंघ डेंजर झोनमध्ये गेले होते आणि ते सेफ झोनमध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या होत्या.

कोकणातील लक्षवेधी लढती

रायगड- श्रीवर्धन – विनोद घोसाळकर (शिवसेना) vs अदिती तटकरे (राष्ट्रवादी)

Loading...

रत्नागिरी : उदय सामंत (विजय निश्चित) vs सुदेश मयेकर

दापोली – योगेश कदम (शिवसेना) vs संजय कदम (राष्ट्रवादी)

गुहागर – भास्कर जाधव (शिवसेना) vs सहदेव बेटकर (राष्ट्रवादी)

कणकवली – नितेश राणे (भाजप) vs सतीश सावंत (शिवसेना)

वैभव नाईक विरुध्द रणजीत देसाई ( अपक्ष / भाजपा पुरस्कृत )

सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना) vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी) vs राजन तेली (भाजप बंडखोर)

पालघर – श्रीनिवास वनगा (शिवसेना) vs योगेश नम (काँग्रेस)

बोईसर – विलास तरे (शिवसेना) vs राजेश पाटील (बविआ)

नालासोपारा – प्रदीप शर्मा (शिवसेना) vs क्षितिज ठाकूर (बविआ)

वसई – विजय पाटील (शिवसेना) vs हितेंद्र ठाकूर (बविआ)

2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपला 24 पैकी 05 जागा तर शिवसेनेला 09 जागा मिळाल्या होत्या. या वर्षी मतदानोत्तर चाचणीत भाजप- सेना युतीला 21 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यात शिवसेनेला 14 आणि भाजपला 07 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आघडीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्षच्या खात्यात 1 जागा पडण्याची शक्यता आहे.

2014 निवडणूक

शिवसेना 09

भाजप 05

एनसीपी 04

बहुजन विकास आघाडी 03

शेकाप 02

कांग्रेस 01

2009 निवडणूक

शिवसेना 04

भाजप 03

एनसीपी 06

कांग्रेस 03

बहुजन विकास आघाडी 02

शेकाप 03

अपक्ष 03

==============================================

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...