गुहागरमध्ये शिवसेनेचं पारडं जड, राष्ट्रवादीला मोठा धक्का

शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव नवव्या फेरीअंती 8693 मतांनी आघाडीवर आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 12:39 PM IST

गुहागरमध्ये शिवसेनेचं पारडं जड, राष्ट्रवादीला मोठा धक्का

रत्नागिरी, 24 ऑक्टोबर: गुहागरमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी चुरशीची लढत आहे. या लढतीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. भास्कर जाधव यांनी सेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गडाला चांगलाच सुरुंग लागला आहे. शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव नवव्या फेरीअंती 8693 मतांनी आघाडीवर आहेत. गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर अशी अटीतटीची लढत आहे. नवव्या फेरीअंती राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर यांना 22262 मतं मिळाली आहेत. एकूणच सध्याचा कल पाहता गुहागर मतदारसंघात शिवसेनेचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.

भास्कर जाधव यांनी 2014 साली राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. मात्र काही कलहांमुळे भास्कर जाधवांनी 2019 विधानसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भास्कर जाधव यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सेनेचे उमेदवार भास्कर जाधव विरुद्ध राष्ट्ररवादीचे सहदेव बेटकर आमने-सामने येणार आहेत. बेटकर यांना समाजघटकांचे पाठबळ आहे. तर भाजपला हा मतदारसंघ न मिळाल्या अंतर्गत नाराजी आहे. त्यामुळे गुहागर मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची चिन्हं आहेत.

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

Loading...

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

LIVE VIDEO : नितेश राणे जिंकले, सेनेला टोला लगावत निलेश यांनी केला जल्लोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2019 12:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...