Konkan Election Result 2019 LIVE : कणकवलीत धक्का बसलेला असतानाही शिवसेनेनं कोकणचा गड राखला

Konkan Election Result 2019 LIVE : कणकवलीत धक्का बसलेला असतानाही शिवसेनेनं कोकणचा गड राखला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारसंघानुसार निकाल वाचा फक्त एका क्लिकवर.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 24 ऑक्टोबर: महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. 2014च्या विधानसभेप्रमाणेच यंदाही जनतेचा कौल हा महायुतीला असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. कोकणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ होण्याची चिन्हं आहेत. आतापर्यंत हाती आलेले कोकणातील निकाल याप्रमाणे आहेत.

सिंधुदुर्ग-

कणकवली-देवगड मतदारसंघ

कणकवली-वैभववाडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे विरुद्ध शिवसेना उमेदवार सतीश सावंत अशी चुरशीची लढत होती. मात्र जनतेनं नितेश राणेंना मोठा कौल दिल्याचं पाहायला मिळत आहे.कणकवली-देवगड मतदारसंघात पुन्हा एकदा नितेश राणे बहुमतानं विजयी झाले आहेत.

कुडाळ मतदारसंघ

2014 प्रमाणेच पुन्हा एकदा शिवसेनेला आपला गड राखण्यात यश मिळालं आहे. कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक बहुमताने विजयी झाले आहेत. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजीत देसाई अशी चुरशीची लढत होती. मात्र रणजीत देसाईंना धूळ चारत पुन्हा एकदा वैभव नाईक यांनी गुलाल उधळला आहे.

सावंतवाडी मतदारसंघ

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार दिपक केसरकर यांनी बहुमतांनी विजय मिळवला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात शिवसेना उमेदवार दिपक केसरकर विरुद्ध राष्ट्रवादीचे बबन साळगांवकर विरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार राजन तेली अशी तिरंगी लढत रंगली होती. मात्र शिवसेनेच्या दिपक केसरकर यांनी बहुमतांनी आघाडी घेत विजयवर शिक्कामोर्तब केलं. सावंतवाडीमध्ये गड राखण्यात शिवसेना यशस्वी ठरली.

रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंतचे कल

गुहागर

शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव नवव्या फेरीअंती 8693 मतांनी आघाडीवर आहेत. गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर अशी अटीतटीची लढत आहे. नवव्या फेरीअंती राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर यांना 22262 मतं मिळाली आहेत. एकूणच सध्याचा कल पाहता गुहागर मतदारसंघात शिवसेनेचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.

चिपळूण मतदारसंघ

राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांनी चिपळूण मतदारसंघात आपलं पहिलं खातं उघडलं आहे. राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी 1 लाख 520 मतं मिळाली असून शिवसेना उमेदवार सदानंद चव्हाण यांच्यावर 29 हजार 297 मतांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांना 71 हजार 223 मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराला धूळ चारत राष्ट्रवादीचे उमेदवार निकम यांनी 29 हजार 297 मतांनी बाजी मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. चिपळूण मतदारसंघात शेखर निकम समर्थकांनी फटाके फोडून गुलाल उधळला आहे.

लांजा मतदारसंघ

लांजा राजापूर मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा विजय झाला आहे. याआधी राजापूर मतदारसंघातून राजन सावळी यांनी दोनवेळा विजय मिळवला होता. यंदा पुन्हा एकदा शिवसेनेनं आपला गड राखला आहे. शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना जनतेनं बुहमतानं विजयी केलं आहे.

दापोली मतदारसंघ

दापोली मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांना पराभव पत्करावा लागला.

रत्नागिरी मतदारसंघ

रत्नागिरी मतदासंघातील शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुदेश मयेकर रिंगणात आहेत. उदय सामंत यांचे पारडं जड असून जवळपास विजय निश्चित असल्याचा कल सांगत आहे. एकूणच रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामध्ये आता उदय सामंत यांची विजयाच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे.

LIVE VIDEO : उदयनराजे अडचणीत, तर मनसेसाठी खूशखबर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 02:05 PM IST

ताज्या बातम्या