Konkan Election Result 2019 LIVE Updates : कोकणात काय आहे मतदारांचा कौल

Konkan Election Result 2019 LIVE Updates : कोकणात काय आहे मतदारांचा कौल

कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकून 24 सीटसाठी मतदान झालं. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेनं कोकणात आपलं वर्चस्व राखलं होतं. मात्र यंदा नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हे चित्र पलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मागच्या वेळप्रमाणे यावेळीही शिवसेना कोकणचा गड राखणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दापोली  विधानसभा-शिवसेना-योगेश रामदास कदम -  5086  मतांनी आघाडीवर

श्रीवर्धन नववी फेरी - आदिती तटकरे - 16,200 मतांनी आघाडीवर

नालासोपारामधून क्षितिज ठाकूर 7,443 मतांनी आघाडीवर

पालघरमध्ये श्रीनिवास वनगा 981 मतांनी अघाडीवर

श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आघाडीवर

पालघरमध्ये श्रीनिवास वनगा आघाडीवर

कणकवलीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपला 24 पैकी 05 जागा तर शिवसेनेला 09 जागा मिळाल्या होत्या. या वर्षी मतदानोत्तर चाचणीत भाजप- सेना युतीला 21 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यात शिवसेनेला 14 आणि भाजपला 07 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आघडीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्षच्या खात्यात 1 जागा पडण्याची शक्यता आहे.

2014 निवडणूक

शिवसेना 09

भाजप 05

एनसीपी 04

बहुजन विकास आघाडी 03

शेकाप 02

कांग्रेस 01

2009 निवडणूक

शिवसेना 04

भाजप 03

एनसीपी 06

कांग्रेस 03

बहुजन विकास आघाडी 02

शेकाप 03

अपक्ष 03

================================================

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 10:22 AM IST

ताज्या बातम्या