Konkan Election Result 2019 LIVE : सावंतवाडीतून शिवसेनेचे दिपक केसरकर विजयी!

Konkan Election Result 2019 LIVE : सावंतवाडीतून शिवसेनेचे दिपक केसरकर विजयी!

सावंतवाडी विधानसभा मतदार संघात शिवसेना उमेदवार दिपक केसरकर विरुद्ध राष्ट्रवादीचे बबन साळगांवकर विरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार राजन तेली अशी तिरंगी लढत रंगली होती.

  • Share this:

सावंतवाडी, 24 ऑक्टोबर : कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकून 24 सीटसाठी मतदान झालं. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेनं कोकणात आपलं वर्चस्व राखलं होतं. त्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार दिपक केसरकर यांनी बहुमतांनी विजय मिळवला आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघात शिवसेना उमेदवार दिपक केसरकर विरुद्ध राष्ट्रवादीचे बबन साळगांवकर विरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार राजन तेली अशी तिरंगी लढत रंगली होती. मात्र शिवसेनेच्या दिपक केसरकर यांनी बहुमतांनी आघाडी घेत विजयवर शिक्कामोर्तब केलं. सावंतवाडीमध्ये गड राखण्यात शिवसेना यशस्वी ठरली. तर कणकवलीमध्ये मात्र भाजपनं बाजी मारली आहे. भाजप उमेदवार नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदार संघात विजय मिळवला.

कोकणातील लक्षवेधी लढती

रायगड- श्रीवर्धन – विनोद घोसाळकर (शिवसेना) vs अदिती तटकरे (राष्ट्रवादी)

रत्नागिरी : उदय सामंत (विजय निश्चित) vs सुदेश मयेकर

दापोली – योगेश कदम (शिवसेना) vs संजय कदम (राष्ट्रवादी)

गुहागर – भास्कर जाधव (शिवसेना) vs सहदेव बेटकर (राष्ट्रवादी)

कणकवली – नितेश राणे (भाजप) vs सतीश सावंत (शिवसेना)

वैभव नाईक विरुध्द रणजीत देसाई ( अपक्ष / भाजपा पुरस्कृत )

सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना) vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी) vs राजन तेली (भाजप बंडखोर)

पालघर – श्रीनिवास वनगा (शिवसेना) vs योगेश नम (काँग्रेस)

बोईसर – विलास तरे (शिवसेना) vs राजेश पाटील (बविआ)

नालासोपारा – प्रदीप शर्मा (शिवसेना) vs क्षितिज ठाकूर (बविआ)

वसई – विजय पाटील (शिवसेना) vs हितेंद्र ठाकूर (बविआ)

2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपला 24 पैकी 05 जागा तर शिवसेनेला 09 जागा मिळाल्या होत्या. या वर्षी मतदानोत्तर चाचणीत भाजप- सेना युतीला 21 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यात शिवसेनेला 14 आणि भाजपला 07 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आघडीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्षच्या खात्यात 1 जागा पडण्याची शक्यता आहे.

2014 निवडणूक

शिवसेना 09

भाजप 05

एनसीपी 04

बहुजन विकास आघाडी 03

शेकाप 02

कांग्रेस 01

2009 निवडणूक

शिवसेना 04

भाजप 03

एनसीपी 06

कांग्रेस 03

बहुजन विकास आघाडी 02

शेकाप 03

अपक्ष 03

==============================================

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

First published: October 24, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading