Konkan Election Result 2019 LIVE : अदिती तटकरे विजयी तर सेनेच्या घोसाळकरांचा दारूण पराभव

अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 02:19 PM IST

Konkan Election Result 2019 LIVE : अदिती तटकरे विजयी तर सेनेच्या घोसाळकरांचा दारूण पराभव

कोकण, 24 ऑक्टोबर : कोकणात विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. यापैकी कोकणात एकूण 24 सीटसाठी मतदान झालं. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेनं कोकणात आपलं वर्चस्व राखलं होतं. त्यामुळे यावेळीही कोकणचा गड राखण्यात शिवसेना यशस्वी ठरणार का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

दरम्यान रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विनोद घोसाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे अशी लक्षवेधी लढत आहे. अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या आहेत. अदिती तटकरे या 38 हजार 783 ने विजयी झाल्या आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचा दारूण पराभव झाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.

रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीवर्धन मतदारसंघात तटकरेंच्या मुलीने राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे.

कोकणातील लक्षवेधी लढती

रायगड- श्रीवर्धन – विनोद घोसाळकर (शिवसेना) vs अदिती तटकरे (राष्ट्रवादी)

Loading...

रत्नागिरी : उदय सामंत (विजय निश्चित) vs सुदेश मयेकर

दापोली – योगेश कदम (शिवसेना) vs संजय कदम (राष्ट्रवादी)

गुहागर – भास्कर जाधव (शिवसेना) vs सहदेव बेटकर (राष्ट्रवादी)

कणकवली – नितेश राणे (भाजप) vs सतीश सावंत (शिवसेना)

वैभव नाईक विरुध्द रणजीत देसाई ( अपक्ष / भाजपा पुरस्कृत )

सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना) vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी) vs राजन तेली (भाजप बंडखोर)

पालघर – श्रीनिवास वनगा (शिवसेना) vs योगेश नम (काँग्रेस)

बोईसर – विलास तरे (शिवसेना) vs राजेश पाटील (बविआ)

नालासोपारा – प्रदीप शर्मा (शिवसेना) vs क्षितिज ठाकूर (बविआ)

वसई – विजय पाटील (शिवसेना) vs हितेंद्र ठाकूर (बविआ)

2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपला 24 पैकी 05 जागा तर शिवसेनेला 09 जागा मिळाल्या होत्या. या वर्षी मतदानोत्तर चाचणीत भाजप- सेना युतीला 21 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यात शिवसेनेला 14 आणि भाजपला 07 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आघडीला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्षच्या खात्यात 1 जागा पडण्याची शक्यता आहे.

2014 निवडणूक

शिवसेना 09

भाजप 05

एनसीपी 04

बहुजन विकास आघाडी 03

शेकाप 02

कांग्रेस 01

2009 निवडणूक

शिवसेना 04

भाजप 03

एनसीपी 06

कांग्रेस 03

बहुजन विकास आघाडी 02

शेकाप 03

अपक्ष 03

==============================================

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 12:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...