चाकरमान्यांची कोकण बंदी टळली, यंदाचाही गणेशोत्सव गावीच मात्र...

चाकरमान्यांची कोकण बंदी टळली, यंदाचाही गणेशोत्सव गावीच मात्र...

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : मुंबई व इतर शहरांमधील नागरिकांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास बंदी असल्याचे वृत्त काल प्रसिद्ध झाले होते. मात्र यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. चाकरमान्यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात यावे हिच आमची भूमिका आहे. त्यांचा कोणत्याही स्वरुपाचा विरोध नसल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.

आज सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.  यावेळी ते म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात ( क्वारंटाईन ) चौदा दिवस ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवणे, त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देणे, त्यांच्या पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन तसेच त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा अशा विविध विषयांवर सविस्तर बैठकीत चर्चा करण्यात आली.

कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

हे वाचा-स्वत:च्याच घरात अभिनेत्रीचा बलात्कार, आरोपीकडून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

याशिवाय शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने आचारसंहिता तयार करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने ICMR कोकणातील चाकरमान्यांसाठी क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा करावा, असेही राऊत यांनी म्हटले.

Published by: Meenal Gangurde
First published: July 10, 2020, 9:36 PM IST

ताज्या बातम्या