मुसळधार: राधानगरीत अडकले गोव्याचे 150 प्रवासी, बचाव कार्य सुरू

रस्ता पाण्यात बुडाल्याने बसेस आणि प्रवासी पुराच्या पाण्यात अडकून पडलेत. पाण्याची पातळी वाढत असून सर्व प्रवाशांना सुरक्षीत बाहेर काढण्याचं काम सुरू झालंय.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 06:04 PM IST

मुसळधार: राधानगरीत अडकले गोव्याचे 150 प्रवासी, बचाव कार्य सुरू

संदीप राजगोळकर, 6 ऑगस्ट : पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि गोव्याचे सुमारे दिडशे प्रवाशी  राधानगरी इथं पुराच्या पाण्यात अडकून पडले. कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्त्यावर पुराचं पाणी आलं आहे. हा रस्ता पाण्यात बुडाल्याने बसेस आणि प्रवासी पुराच्या पाण्यात अडकून पडलेत. पाण्याची पातळी वाढत असून सर्व प्रवाशांना सुरक्षीत बाहेर काढण्याचं काम सुरू झालंय. आकाशातून कोसळणारा पाऊस, धरणांमधून सोडलं जाणारं पाणी यामुळे  नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलीय. त्याचबरोबर नाले आणि ओढ्यांमधूनही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यानं हा सगळा परिसर जलमय झालाय.

कराड शहराला पूराचा विळखा, यशवंतराव चव्हाणांची समाधी पाण्यात

पुणे येथून सुमारे दिडशे प्रवाशांना घेऊन बारा बसेस गोव्यात येत होत्या. काल (५ ऑगस्ट) सोमवार मध्यरात्री अडीज वाजता बसेस कोल्हापूर येथे दाखल झाल्या. कोल्हापूरात पोहोचल्यानंतर पुढील महामार्गावर पुराचे पाणी आल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरहुन गोव्यात येण्यासाठी मॅपचा आधार घेत गारगोटी, देवगड हा अंतर्गत रस्ता धरला. या रस्यावर पूर्वीपासून पाणी आले होते. याची माहिती बस चालकांना नसल्याने त्यांनी बसेस तशाच पुढे नेल्या. राधानगरी येथे पोहोचताच त्यांना येथील सर्व गाव पाण्याखाली गेल्याचे समजले. सर्व बसेस मागे नेण्याचा प्रयत्न केला असता मागील भाग सुद्धा पाण्यात बुडल्याचे त्यांना आढळून आले.

VIDEO : लोकसभेत असं काय बोलल्या नवनीत राणा की, अमित शहांनाही आलं हसू

दरम्यान बसच्या चालकाने निष्काळजी पणा दाखवत बस तशीच पुढे नेल्यामूळे सदर बस राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर पाण्यात अडकली. धोक्याचा इशारा दिलेला असतांना बस पूढे नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घेतल्यामुळे संतापलेल्या लोकांनी बस चालकाला बेदम चोप दिल्याचीही माहिती आहे. जवळच्या गावातील सर्व लोकांनी बचाव पथकाच्या मदतीने दुसऱ्या जागी हलवले आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...