मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मॉर्निंग वॉकसाठी टेरेसवर गेला अन् मृत्यूनं गाठलं; कोल्हापुरातील मन हेलावणारी घटना

मॉर्निंग वॉकसाठी टेरेसवर गेला अन् मृत्यूनं गाठलं; कोल्हापुरातील मन हेलावणारी घटना

Crime in Kolhapur: कोल्हापुरात टेरेसवर जाऊन व्यायाम करणाऱ्या एका तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला आहे.

Crime in Kolhapur: कोल्हापुरात टेरेसवर जाऊन व्यायाम करणाऱ्या एका तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला आहे.

Crime in Kolhapur: कोल्हापुरात टेरेसवर जाऊन व्यायाम करणाऱ्या एका तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 27 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) सुरू आहे. कोरोना विषाणूच्या भीतीनं अनेकजण जिमला जाण्यास टाळाटाळ करत आहेत. पण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते पर्यायी मार्गाचा अवलंब करत आहेत. घरात किंवा टेरेसवर जाऊन व्यायाम करण्याला अनेकांकडून प्राधान्य दिलं जात आहे. पण कोल्हापुरात टेरेसवर जाऊन व्यायाम करणाऱ्या एका तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला आहे.

टेरेसवर मॉर्निंग वॉक (Went terrace for morning walk) करत असताना, समतोल बिघडून संबंधित तरुण थेट जमिनीवर कोसळला (death after fall down from terrace) आहे. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. ही मन हेलावणारी घटना कोल्हापूर शहरातील महाडिक वसाहतीत घडली आहे. प्रवीण प्रकाश महाडिक असं मृत पावलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. मृत महाडिक हे कोल्हापूर शहरातील महाडिक वसाहतीतील रहिवासी असून गोकूळ दुध संघाच्या पशुखाद्य विभागात नोकरीस आहेत.

हेही वाचा-पंतप्रधानांचा सुरक्षा रक्षकच असुरक्षित! भामट्याने खास कमांडोचं पाकीट केलं लंपास

महाडिक यांना व्यायामाची आवड असून ते नेहमी आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन व्यायाम करतात. नेहमी प्रमाणे ते शुक्रवारी सकाळी देखील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करत होते. दरम्यान व्यायाम करत असताना, समतोल बिघडून ते तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली जमिनीवर कोसळले. या दुर्दैवी घटनेच महाडिक गंभीर जखमी झाले.

हेही वाचा-पतीच्या निधनानंतर FBवरील तरुणानं दाखवली सुखी संसाराची स्वप्न पण..; बीडमधील घटना

महाडिक टेरेसवरून पडल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना प्रवीण महाडिक यांची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी सीपीआर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kolhapur