मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पैशांपुढे मैत्री हरली; कोल्हापुरात तिघांनी जीवलग मित्राचा केला घात, मृतदेह पाहून पोलिसांचा उडाला थरकाप

पैशांपुढे मैत्री हरली; कोल्हापुरात तिघांनी जीवलग मित्राचा केला घात, मृतदेह पाहून पोलिसांचा उडाला थरकाप

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Murder in Kolhapur: शिरोळ तालुक्यातील तीन तरुणांनी आपल्याच एका मित्राची निर्घृण हत्या (young man murdered by 3 friends) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 23 डिसेंबर: शिरोळ तालुक्यातील तीन तरुणांनी आपल्याच एका मित्राची निर्घृण हत्या (young man murdered by 3 friends) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पैशांच्या देवाणघेवाणीतून (money dispute) ही हत्या केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या (attack with sharpen weapon) करून मृतदेह अर्धवट जाळून टाकला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी हत्येची उकल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक (2 accused arrested) केली आहे. अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

प्रशांत संजय भिसे असं हत्या झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव असून तो शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील रहिवासी आहे. तर  प्रताप उर्फ गुंड्या संजय माने, अमोल उर्फ दाद्या दत्ता हराळे आणि सागर अजित होगले असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मित्रांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रशांत आणि सर्व आरोपी एकमेकांचे जीवलग मित्र होते. प्रशांत हा बेरोजगार असल्याने त्याने आपल्या मित्रांकडून काही पैसे उधार घेतले होते.

हेही वाचा-जादूटोण्याच्या संशयातून पतीचं पत्नीसोबत विचित्र कृत्य; भयावह अवस्थेत आढळली महिला

दरम्यान घटनेच्या दिवशी 15 डिसेंबर रोजी मृत प्रशांत आपल्या मित्रांसोबत बोलत बसला होता. गप्पा मारत असताना पैशांच्या देवाणघेवाणीतून प्रशांतचा आपल्या मित्रांसोबत वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन प्रशांतने तिन्ही मित्रांसोबत झटापट केली. यावेळी एकाने प्रशांतवर धारदार शस्त्राने वार केले. ज्यामध्ये प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी प्रशांतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याची दुचाकी जवळील एका विहिरीत टाकली.

हेही वाचा-घराबाहेर पडला होता पत्नीचं शिर कापलेला मृतदेह; ते दृश्य पाहून नागरिक हादरले!

घटनेच्या दोन दिवसांनंतर, शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास शिरोळ तालुक्यातील कोथळी गावच्या हद्दीत गायरान जमिनीतील कचरा डेपोमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची झालेली अवस्था पाहून पोलिसांचा  थरकाप उडाला. मृतदेहाचा छातीपासून घालचा सर्व भाग जळाला होता. पण चेहरा मात्र जळाला नव्हता. त्यामुळे मृताची ओळख पटवणं पोलिसांना शक्य झालं.

हेही वाचा-प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनं चिमुकल्याचा घोटला गळा; अनैतिक संबंधातून काढला काटा

ही घटना उघडकीस आल्यानंतर, अवघ्या काही तासांतच जयसिंगपूर पोलिसांनी हत्येची उकल केली आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. प्रताप माने आणि सागर होगले असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. अमोल उर्फ दाद्या दत्ता हराळे हा संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Murder