मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: कोल्हापुरातील भुयेवाडीत गव्याचा धुमाकूळ; पोटात शिंग खूपसल्याने तरुणाचा दुर्दैवी अंत

VIDEO: कोल्हापुरातील भुयेवाडीत गव्याचा धुमाकूळ; पोटात शिंग खूपसल्याने तरुणाचा दुर्दैवी अंत

Kolhapur News: गव्याला नैसर्गिक आधीवासात पुन्हा हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांवर गव्याने हल्ला (gaur attack on young men) केला आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू (died in gaur attack) झाला आहे.

कोल्हापूर, 12 डिसेंबर: शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास करवीर तालुक्यातील भुयेवाडी गावात गव्याने शिरकाव केला होता. संबंधित गव्याला नैसर्गिक आधीवासात पुन्हा हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर या गव्याने हल्ला (gaur attack on young men)केला आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू (died in gaur attack) झाला आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी (Injured) झाले आहे. संबंधित गव्याचा रस्त्यावरून फिरतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Viral video) होतं आहे.

शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गवा भुयेवाडीत शिरल्यानंतर, सर्वप्रथम त्याने प्रल्हाद पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. पाटील हे आपल्या गुऱ्हाळाजवळ होते. त्यावेळी त्याठिकाणी गवा आला. पण गुऱ्हाळाजवळील गोठ्यात अनेक जनावरं होती. त्यामुळे गवा पाळीव प्राण्यावर हल्ला करेन, या भीतीने पाटील यांनी गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण चवताळलेल्या गव्याने पाटील यांना जबरदस्त धडक मारत त्यांना जमिनीवर आपटलं.

हेही वाचा-रात्रभर मारल्या चकरा अन् पहाटे पाडला रक्ताचा सडा; झोपलेल्या पत्नीचा खेळ खल्लास

यानंतर गावातील काही तरुणांनी चवताळलेल्या गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण बिथरलेला गवा अनेकांवर हल्ला करत होता. या हल्ल्यात सौरभ खोत नावाच्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गव्याला हुसकावत असताना गव्याने तरुणाच्या पोटात शिंग खूपसून कोथळा बाहेर काढला आहे. या घटनेत सौरभचा जागीच निपचित पडला. नातेवाईकांनी त्याला तातडीने कोल्हापुरातील सीपीआर येथे दाखल केलं. पण याचा काहीही फायदा झाला नाही. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे.

गव्याच्या हल्ल्यात प्रल्हाद उर्फ लाला पाटील यांच्यासह आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. गव्याचा रस्त्यावरून फिरतानाचा एका व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. हा गवा एका रस्त्यावरील पुलावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला मार्ग सापडत नव्हता.

First published:
top videos

    Tags: Crime news, Kolhapur