मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गर्भवती पत्नीसोबत पतीचं राक्षसी कृत्य; दोन जीवांच्या महिलेनं जन्माआधीच गमावलं बाळ

गर्भवती पत्नीसोबत पतीचं राक्षसी कृत्य; दोन जीवांच्या महिलेनं जन्माआधीच गमावलं बाळ

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी येथे एक अमानुष घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या गर्भवती पत्नीसोबत राक्षसी कृत्य केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

इचलकरंजी, 25 डिसेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या इचलकरंजी (Ichalkaranji) याठिकाणी एक अमानुष घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण (Husband beat wife) केली आहे. तरुणानं केलेल्या मारहाणीत पीडित महिलेचा गर्भपात झाला असून तिने जन्माआधीच आपलं बाळ गमावलं (wife had abortion after beaten by husband) आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

यासीन मन्सूर नदाफ असं गुन्हा दाखल झालेल्या 26 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी यासीन हा इचलकरंजी येथील आसरानगर परिसरातील रहिवासी आहे. मुबिना नदाफ असं पीडित महिलेचं नाव असून दोघांमध्ये 2017 पासून कौटुंबीक वाद सुरू आहे. गेल्या काही काळापासून आरोपी यासीन हा पीडित महिलेच्या आईला आणि भावाला ठार मारण्याची धमकी देत होता. तसेच पत्नीला माहेरी किंवा इतर नातेवाईकांकडे जाण्यास मज्जाव करत होता.

हेही वाचा-भाकर मागताच संपापली सुन, सासूच्या कानशिलात लगावत हाताची बोटं मोडली, पतीलाही झोडल

22 डिसेंबर रोजी घटनेच्या दिवशी देखील घरगुती कारणातून दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर चिडलेल्या आरोपी यासीन याने पीडित महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने कंबरेच्या पट्ट्याने गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की, मुबिना यांना पोटात दुखापत होऊन त्यांचा गर्भपात झाला.

हेही वाचा-बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उकळले 3 लाख; डाव उलटला अन्...

याशिवाय आरोपीनं यापूर्वी देखील पीडितेला माहेरहून पैसे आणि दागिने घेऊन येण्यासाठी अनेकदा मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं गावभाग पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Kolhapur