ज्ञानेश्वरसाळोखे, प्रतिनिधीकोल्हापूर 15 जुलै : कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा सुरू आहे. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांच्यासह सध्याच्या राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंदुत्वाचा मुर्दा पाडला. कपाळावर टिळा लावण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे, अशी टोकाची टीका विनायक राऊत (Vinayak Raut Slams Eknath Shinde) यांनी केली आहे.
ठाकरे-शिंदे संघर्ष! ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्यांना शिंदेंकडून पुन्हा पदं; पुर्ननियुक्त्या करत दिले महत्त्वाचे आदेश
संभाजीनगरचं नाव बदलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घोषित केला होता. ज्याला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावरुनही त्यांनी टीका केली आहे. विनायक राऊत म्हणाले, की हे करताना जनाची ना मनाची तरी वाटायला हवी. लाचारी पत्करली पण दिघे साहेबांचे तरी स्मरण करा, असं विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंना म्हटलं.
राजेश क्षीरसागर यांच्यावरही विनायक राऊत यांनी टीका केली. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत बेईमानीची कीड मी स्वतः अनुभवली. घरी जेवायला बोलवून खर्च दुसऱ्याकडून करायचा ही क्षीरसागर यांची वृत्ती आहे. मला आणि नाना पटोलेंना घरी घातलेल्या जेवणाचा खर्च बंटी पटलांकडून घेतला, असा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील सरकारवर बोलताना विनायक राऊत म्हणाले, फडणवीस आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढतात, उद्या पॅन्ट ओढतील आणि त्यांना नागडे करून सोडतील. खोक्यांना बळी पडलेल्यांचं राजकीय आयुष्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
Video: "दादा तुमच्या शब्दावर आम्ही मतं दिली...", संतापलेल्या दशरथ सावंतांच्या कार्यकर्त्यांनी अडवला अजित पवारांचा ताफा
फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या मुद्द्यावरुनही त्यांनी फडणवीसांना डिवचलं. राऊत म्हणाले, मला अमृता फडणवीस यांचं वाईट वाटतं. किती नवस केले त्यांनी, पण फडणवीस हे बहुरूपी आहेत हे दिल्लीने सिद्ध केलं. दिल्लीने फडणवीसांचा बकरा केला, असं विनायक राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.