मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : पुण्याच्या दोन नृत्यांगनांचं किळसवाणं कृत्य; लग्नात अश्लील हावभाव करीत बीभत्स डान्स, अखेर गुन्हा दाखल

Video : पुण्याच्या दोन नृत्यांगनांचं किळसवाणं कृत्य; लग्नात अश्लील हावभाव करीत बीभत्स डान्स, अखेर गुन्हा दाखल

या दोघींसह आणखी 8 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या दोघींसह आणखी 8 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या दोघींसह आणखी 8 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कोल्हापूर, 10 जुलै : लग्नाच्या वरातीत अश्लील हावभाव करत बीभत्स नृत्य करणाऱ्या तरुणींना कोल्हापूर (Kolhapur News) पोलिसांनी दणका दिला आहे. या 8 पैकी दोन नृत्यांगना पुण्याच्या आहेत. पुण्याच्या दोन नृत्यांगनांसह (Two dancers from Pune) आठ जणांवर वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेचा अनेक व्हिडीओ (Shocking Video) समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉलीसह डॉल्बी सिस्टीमही जप्त केली आहे. याशिवाय पुण्याच्या नृत्यांगणा युगश्री शेरकर, अंजली थापा यांच्यासह आठ जणांवर वडगाव पोलिसांनी कारवाई केली आहे.

या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ येथे दाखवूही शकत नाही. दरम्यान लग्न कार्यक्रमात अशा प्रकारचे डान्सचं आयोजन करण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली आहे. नृत्यांगनांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी लोक पुढे पुढे येत आहेत.

दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जावी, अशी मागणी आहे. कोणाच्या लग्नाच्या निमित्ताने या डान्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तरी पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत.

First published:

Tags: Kolhapur, Pune