मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजप, राष्ट्रवादी युतीबाबत उदयनराजेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले जर नागालँडमध्ये..

भाजप, राष्ट्रवादी युतीबाबत उदयनराजेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले जर नागालँडमध्ये..

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजप सत्तेत असलेल्या सरकारला पाठिंबा दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता उदयनराजे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 11 मार्च : नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजप सत्तेत असलेल्या सरकारला पाठिंबा दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. चर्चा सुरू झाल्यानंतर आपण सरकारला नाही तर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आता खासदार उदयनराजे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हटले उदयनराजे? 

नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करत आहेत, याबाबत उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी खोचक टोला लगावला आहे. त्या बैठकीला मला बोलावलं नसल्याचं त्यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर तिथं ठरल असेल तर उद्या महाराष्ट्रातही ठरू शकत, अस सूचक विधान उदयनराजे यांनी केलं आहे. उदयनराजे यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी असंच विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला जर महाराष्ट्रात आमच्यासोबत आले तर स्वागत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.

पंकजा मुंडेंविरोधात निवडणूक लढवणार का? सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या

पेटिंगवर प्रतिक्रिया   

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पोवई नाक्यावर काढलेल्या त्यांच्या पेंटिंगवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पेंटिंग बाबत चर्चा मला प्रसारमाध्यमांमधून समजली. पेंटिंग प्रकरणावरून कोणताही वाद झालेला नाही. यामध्ये किरकोळ गैरसमज झाला होता. मात्र वाद वगैरे काही नाही, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

खडसेंना मोठा धक्का; जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार, बंडखोरी भोवली?

शिवेंद्रराजेंना टोला 

शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंचे चित्र संपूर्ण अजिंक्यतारा किल्ल्यावर काढायला हरकत नाही असा टोला मारला होता. त्याला देखील उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांची एवढीच इच्छा असेल तर विचार करायला हरकत नाही, लोकांचे प्रेम असल्यामुळे लोक माझे पेंटिग काढतात. त्यांनी जर लोकांची सेवा केली तर लोक त्यांचेही पेंटिंग काढतील असा सल्ला यावेळी उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना दिला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, NCP, Sharad Pawar, Udayanraje bhosle