मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हे कोल्हापुरातच होऊ शकतं; दहावीची पेपर संपला अन् पोरं झाली बेभान, Video व्हायरल

हे कोल्हापुरातच होऊ शकतं; दहावीची पेपर संपला अन् पोरं झाली बेभान, Video व्हायरल

व्हायरल

व्हायरल

देशभरात घेतल्या जाणाऱ्या दहावी बारावीच्या परिक्षांकडे सर्वांचं लक्ष असतं. परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचं संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे असतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 26 मार्च : देशभरात घेतल्या जाणाऱ्या दहावी बारावीच्या परिक्षांकडे सर्वांचं लक्ष असतं. परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचं संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे असतं. परिक्षांदरम्यान सण उत्सव आले तरी त्यांना त्याचा आनंद लुटता येत नाही. महत्त्वाच्या टप्प्यातील परिक्षा असल्यामुळे मुले या परिक्षांबाबत जास्त गंभीर असतात. आता दहावीची परीक्षा संपली आणि विद्यार्थ्यांनी हुशासा सोडला.

गेले वर्षभर तणावात असलेल्या विद्यार्थ्यांनी पेपर संपताच मजा करायला सुरुवात केली. मुलांनी अक्षरशः हलगीच्या ठेक्यावर ताल धरला. शेवटचा पेपर संपताच मैदानाकडे धाव घेत या विद्यार्थ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी रंगपंचमी खेळली. कोल्हापुरातल्या वालावलकर हायस्कूल इथला हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

पेपर संपताच कोल्हापरमधील विद्यार्थ्यांनी रंगाची उधळण करण्यास सुरुवात केली. शाळेच्या आवारात बेभान होऊन डान्स केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता, विद्यार्थी शाळेच्या गणवेशात आहेत. काहींच्या तर पाठीलाही बॅग तशीच आहे. तरीही ते पेपर संपल्याच्या आनंदात नाचतायेत. रंग उधळत, हलगीच्या तालावर ठेका धरतायेत. हे कोल्हापूरमधील आनंदाचं वातावरण सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

कोल्हापूरकरांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरतोय. पेपर संपल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकतोय. कोल्हापुरातल्या वालावलकर हायस्कूल इथला हा व्हिडीओ असून येथील विद्यार्थ्यांच्या हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खूश व्हाल.

First published:
top videos

    Tags: Board Exam, Dance video, Kolhapur, Top trending, Videos viral, Viral