मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ते काही बोलू शकतात, त्यांच्या तोंडाला...' शरद पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं

'ते काही बोलू शकतात, त्यांच्या तोंडाला...' शरद पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं

'फुले शाहू आंबेडकरांचे नाव का घेतात. यासाठी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र वाचला पाहिजे'

'फुले शाहू आंबेडकरांचे नाव का घेतात. यासाठी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र वाचला पाहिजे'

त्यांचं एक खास वैशिष्टय आहे. ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादं भाषण देऊन पुढचे तीन चार महिने काय करतात ते मला माहिती नाही

  • Published by:  sachin Salve

कोल्हापूर, 03 एप्रिल :  'ते काहीही म्हणू शकतात, त्यांचा तोंडाला कुणी मर्यादा घालू शकत नाही. ते दोन चार महिन्यातून एक भाषण करतात आणि नंतर भूमिगत होतात, ते काय करतात ते मला माहिती नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)  यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार यांनी गुडीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

'एक गोष्ट चांगली झाली. बरेच वर्ष ते भूमिगत होते. ते काय करताय याचा काही अंदाज नव्हता. राज ठाकरे काहीही म्हणू शकतात, त्यांच्या तोंडाला कुणी आवर घालू शकत नाही.  त्यांचं एक खास वैशिष्टय आहे. ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादं भाषण देऊन पुढचे तीन चार महिने काय करतात ते मला माहिती नाही. पण, आता राज्याच्या सार्वजनिक जीवनात यायला पाहत आहे. हे कालच्या सभेवरून दिसलं, अशा शब्दात शरद पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

(VIDEO : 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला घोडा; कारण जाणून व्हाल भावुक)

'त्यांनी उत्तर प्रदेशचं कौतुक केलं. उत्तर प्रदेशमध्ये अलीकडे ज्या घटना घडल्यात त्यात त्यांना काय दिसलं, हे मला माहिती नाही. अलीकडच्या काळात काय घडलं हे सर्वांना माहिती आहे. निवडणुकीचा निकाल वेगळा लागला ही कारणं वेगळी आहे. लखीमपूर प्रकरण घडलं, शेतकऱ्यांची हत्या झाली. अनेक अशी प्रकरण आहे. त्यावर बोलू शकतो. पण अशा प्रकारची राजवट उत्तम आहे असं त्यांना वाटत असेल तर मला त्यावर काही भाष्य करायचं नाही, राज्यात उद्धव ठाकरे सरकार असं कधी होऊ देणार नाही, असंही पवार म्हणाले.

'आमच्यात कुणाचं काय व्हावं याची चिंता भाजपला काय आम्ही तिन्ही एकत्र आहोत. लोकांना सत्तेचा गैरवापर आवडत नाही. नेत्यांपेक्षा नागरिकांमध्ये लोकशाही बद्दल जास्त प्रेम असतं. एका पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपावरून कारवाई केली जाते. कुणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई केली जाते हे लोकांना समजत याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल, असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं.

(उल्कापिंड की चीनी सॅटेलाईट? महाराष्ट्रात दिसलेला रहस्यमयी आगीचा गोळा नेमका कसला)

'आघाडीमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षाचा गैरसमज असेल तर तो दूर केला पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर जाऊ नये अशी माझी भूमिका आहे. स्वाभिमानी सारखी संघटना आमच्यासोबत हवी आहे. केंद्र सरकारची भूमिका शेतकरी विरोधात आहे अशा वेळी स्वाभिमानी सारखी संघटना हवी आहे.  मला काही राजू शेट्टी यांचे पत्र मिळाले नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

First published: