मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापुरात शिक्षकाने नववी-दहावीतील मुलींना दाखवले पॉर्न व्हिडीओ; विद्यार्थिनी म्हणाल्या..

कोल्हापुरात शिक्षकाने नववी-दहावीतील मुलींना दाखवले पॉर्न व्हिडीओ; विद्यार्थिनी म्हणाल्या..

नववी-दहावीतील मुलींना दाखवले पॉर्न व्हिडीओ

नववी-दहावीतील मुलींना दाखवले पॉर्न व्हिडीओ

कोल्हापूर जिल्ह्यात एका शिक्षकाने शाळेतील नववी आणि दहावीच्या वर्गातील मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 30 जानेवारी : पुरोगामी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. नुकतेच बोगस डॉक्टरांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आता राधानगरी तालुक्यातील एका शाळेत शिक्षकाने शाळेतील नववी आणि दहावीच्या वर्गातील मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे प्रकार?

इंग्रजीच विषयाचा शिक्षक असलेल्या व्ही. पी बांगडीने शाळेतील नववी आणि दहावीच्या मुलींना पॉर्न व्हिडीओ दाखवला. यानंतर या शिक्षकाची साताऱ्यामध्ये बदली करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांमधून तसेच पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून केली जात आहे. गेल्या दोन वर्षापासून शिक्षक बांगडीने हे असे प्रकार केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनींनी केला आहे. या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित विद्यार्थ्यांनी केली आहे. असा प्रकार शाळेमध्येच घडल्याने आता पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित विद्यार्थीनींकडून करण्यात आली आहे.

वाचा - मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापाची आत्महत्या, सावकाराच्या जाचाने बाप, दोन मुले...

कोल्हापूर बनलंय गर्भलिंगनिदानाचे हब

मागच्या आठवड्यात कोल्हापूर पोलीस आणि आरोग्य विभागाने काल दोन ठिकाणी छापा टाकून गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचे बिंग फोडलं. राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात सुरू असलेल्या या केंद्रावर पोलिसांनी स्वतःहून पेशंट बनत छापा टाकला. या छाप्यात गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे मशीन आणि गर्भपाताची औषधे पोलिसांच्या हाती लागली.पोलिसांनी याबाबत चार जणांना अटक केली आहे.

बारावी नापास असलेले बनावट डॉक्टर ही केंद्र चालवत रुग्णाच्या आयुष्याशी खेळ खेळत होते. अनेक एजेंटांच्या मार्फत ही साखळी सुरू होती. त्यांच्याकडे गर्भपाताची औषधेही सापडली आहेत. त्यामुळे अनेक कळ्या गर्भातच खुडल्याचे स्पष्ट होत आहे. या सगळ्या प्रकारची गंभीर दखल कोल्हापूरचे एसपी शैलेश बलकवडे यांनी घेतली आहे. या प्रकरणात आंतरराज्य टोळी कार्यकरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. ही साखळी मोडीत काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर अवैध धंद्यातून जमवलेली माया जप्त करण्याचीही कारवाई करण्याची कार्यवाहीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

First published:

Tags: Crime, Kolhapur