मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'स्वाभीमानी'चा एकला चलो रे! लोकसभेच्या इतक्या जागा लढविणार; राजू शेट्टींची घोषणा

'स्वाभीमानी'चा एकला चलो रे! लोकसभेच्या इतक्या जागा लढविणार; राजू शेट्टींची घोषणा

राजू शेट्टींची घोषणा

राजू शेट्टींची घोषणा

आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 21 मार्च : गेल्या काही दिवसांपासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आक्रमक भूमिका घेत आहेत. अशातच आज आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार त्याचा  राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत तो निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

काय म्हणाले राजू शेट्टी?

आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे. मी मांडलेला हमीभावाचा कायदा अजून तो प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. शेतकर्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर,  जनार्दन पाटील, अजित,  संदीप राजोबा, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

वाचा - उद्धव ठाकरेंनंतर निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या घड्याळाबाबत मोठा निर्णय!

राजू शेट्टी यांचा शासकीय कर्मचाऱ्यांना सवाल

आज गारपीट झाली अवकाळी झाला, आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची कवितेतून संपात सहभागी सरकारी कर्मचाऱ्यांना सवाल. पंचनाम्या अभावी आमच्या संसाराचा आता वरवंटा होऊ दे का? अशा शब्दात राजू शेट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. कांद्याचे दर, दूध आंदोलन, रास्ता रोको अशा आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी इतरांना त्रास दिला नसल्याची ही आठवण करून दिली.

First published:
top videos

    Tags: Kolhapur, Raju Shetti