कोल्हापूर, 26 जानेवारी : 'मी शरीरानं काडी पैलवान आहे. माझ्या जावायायच्या यशमामुळे मला हिंद केसरीची पदवी मिळाल्यासारखा आनंद होतोय, या शब्दात कोल्हापूरच्या श्रीकांत सुतार यांचे सासरे मोहन सुतार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नुकतेच न्यायाधीश झालेल्या सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी ते खास लेकीकडं कोल्हापूरला आले आहेत.
स्टेनोग्राफर ते जज
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या परीक्षेत ॲड. श्रीकांत सुतार यांनी या परीक्षेत यश संपादन केले. कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सध्या स्टेनोग्राफर म्हणून काम करणारे श्रीकांत आता न्यायाधीश बनले आहेत. त्यामुळे नातेवाईकांसह परिवारातील सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
श्रीकांत यांचे कुटुंबीय मूळचे इचलकरंजी येथील रहिवासी होते. त्यांचे वडील मारुती सुतार हे माळकरी होते. रात्री यंत्रमागावर काम आणि दिवसा सुतारकाम असे अपार कष्ट ते करायचे. वडील मारुती आणि आई कमळाबाई यांनी कष्टाचे दिवस असताना देखील श्रीकांत यांना शिकवले.
Solapur : शिपायाच्या मुलीनं घडवला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश! Video
हे काम सुरू असतानाच त्यांनी 2013 ते 2016 या कालावधीमध्ये भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये एलएलबीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 2017 ते 2019 दरम्यान शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून एलएलएम पूर्ण केलं. कायद्याच्या पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवणाऱ्या श्रीकांत यांनी एलएलएममध्ये शिवाजी विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवला होता.
स्वप्न पूर्ण
स्टेनोग्राफरच्या खुर्चीवरून श्रीकांत यांनी न्यायाधीश होण्याची स्वप्ने मनाशी बाळगली होती. त्यातही त्यासाठी देखील प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यामुळे त्यांनी 2020 साली दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर प्रथम न्यायदंडाधिकारी ही परीक्षा दिली. पण प्राथमिक परीक्षेतच त्यांना अपयश आले. या अपयशानंतर खचून न जाता पुन्हा नव्या दमाने त्यांनी 2021 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा दिली.
यंदा त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. ॲड. श्रीकांत सुतार हे न्यायाधीश बनले आहेत. 24 वर्ष कनिष्ठ लिपिक आणि स्टेनो म्हणून काम करुन आता 44 व्या वर्षी स्वप्न साकार झाल्याचा एक वेगळाच आनंद आणि अभिमान आहे, असे मत श्रीकांत यांनी व्यक्त केले.
Beed : शेतीत राबणारे हात न्यायदान करणार, ग्रामीण भागातील तरुणाची न्यायाधीशपदी निवड, Video
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Kolhapur, Local18, Success story