मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shoumika Mahadik : 'गोकुळ' दुध संघाच्या राजकारणाला पुन्हा उकळी फुटणार, शौमिका महाडिकांनी चेअरमनांची माफी मागितली पण...

Shoumika Mahadik : 'गोकुळ' दुध संघाच्या राजकारणाला पुन्हा उकळी फुटणार, शौमिका महाडिकांनी चेअरमनांची माफी मागितली पण...

गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या सभेत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या दरम्यान महाडिक यांच्याकडून संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचा एकेरी उल्लेख झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला.

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 02 सप्टेंबर : मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा दुध संघाची वार्षीक सर्वसाधारण सभा पार पडली. मागच्या दोन वर्षांपासून ही सभा कोरोनामुळे व्हिडीओ प्रणालीद्वारे झाल्याने समोरासमोर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या नव्हत्या. (Shoumika Mahadik) दरम्यान गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या सभेत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या दरम्यान महाडिक यांच्याकडून संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचा एकेरी उल्लेख झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला. यावर शौमिका महाडिक यांनी फेसबुकच्या माध्यमातून याला उत्तर दिले आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट

गोकुळची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. आपल्या कार्यकर्त्यांना सभागृहात बसवून सत्ताधाऱ्यांनी खऱ्या सभासदांना बसण्यासाठी जागाच ठेवली नव्हती. याबद्दल विचारणा केली असता त्याकडे दुर्लक्ष केले. आमच्या बर्‍याचश्या प्रश्नांची उत्तरे न देता, आमचे म्हणणे न ऐकता अहवाल वाचन केले.

हे ही वाचा : शहाजीबापू पाटलांच्या मतदार संघात कुठलं ओक्के आणि कुठलं काय उपसरपंचाला रस्त्यावरच बेदम मारहाण

अनेक ठरावांना बहुमताकडून नामंजूरीच्या घोषणा होत असतानाही त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचत नव्हता म्हणून आम्ही माईक वापरला. पण त्याचाही आवाज मा.चेअरमन यांच्यापर्यंत पोहचला नाही. साहजिकच आम्हा सर्वांची सहनशीलता संपली होती.

सभासदांच्या हितासाठी आम्ही पोट तिडकीने आमचे म्हणणे मांडत होतो. त्यात अनावधानाने माझ्याकडून आबाजींचा एकेरी उल्लेख झाला, असे आजच पाहण्यात आलेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून मला समजले. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. निश्चितच मी हेतुपूर्वक एकेरी उल्लेख केलेला नव्हता. ते वयाने मोठे आहेत, त्यामुळे मी त्यांचा आदरच करते. पण याचा अर्थ असाही नाही की माझ्या विरोधाची धार कमी होईल. चुकीच्या धोरणांना माझा विरोध कायम राहील. माझ्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित सर्वतोपरी आहे.

हे ही वाचा : नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्याची हत्या; तलावात आढळला मृतदेह

नेमकं काय आहे प्रकरण?

गोकुळच्या वार्षीक सभेवेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील हे गोकुळचा लेखाजोखा वाचत होते. यावेळी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी त्याला विरोध दर्शविला. यादरम्यान शौमिका महाडिक यांच्याकडून चेअरमन पाटील यांना संघाच्या कारभाराबाबत जाब विचारताना एकेरी उल्लेख झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून शौमिका महाडिक यांनी फेसबुकद्वारे खुलासा केला.

First published:

Tags: Kolhapur, Maharashtra politics

पुढील बातम्या