मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार; कोल्हापुरातील संतापजनक घटना

खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार; कोल्हापुरातील संतापजनक घटना

Rape on minor girl: कोल्हापूर जिल्ह्याच्या कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर 35 वर्षीय किराणा दुकानदाराने लैंगिक अत्याचार केला आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 07 डिसेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर 35 वर्षीय किराणा दुकानदाराने लैंगिक अत्याचार (Shopkeeper raped minor girl) केला आहे. पीडित मुलीनं धक्कादायक प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. यानंतर गावातील काही महिलांनी आणि तरुणांनी संबंधित दुकानदाराला चांगलाच चोप दिला आहे. याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

अभिजित सुभाष नाडगोंड असं गुन्हा दाखल झालेल्या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे. ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी दुकानाची तोडफोड केली आहे. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. गावात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आरोपीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा आरोपीवर बाललैंगिक अत्याचाराच्या कलमासह गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा-4 गर्लफ्रेंडच्या प्रेमात आंधळा झाला तरूण; आजीचाच कापला गळा, धक्कादायक खुलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पीडित अल्पवयीन खाऊ आणण्यासाठी आरोपीच्या किराणा दुकानात केली होती. यावेळी पीडित मुलीला एकटं पाहून आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. आपला भांडाफोड झाल्याची कळताच आरोपीनं दुकान बंद करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण गावातील महिलांनी आणि काही तरुणांनी त्याची धरपकड करत त्याला चांगलाच चोप दिला आहे. तसेच काही जणांनी आरोपीच्या दुकानावर दगडफेक करत तोडफोड केली आहे.

हेही वाचा-सुनेला खोलीत कोंडून सासऱ्याचं विकृत कृत्य; हिंगोलीतील धक्कादायक घटना

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीविरोधाता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घडलेल्या प्रकरणाबाबत आरोपीची कसून चौकशी केली जात आहेत. सबळ पुरावे लागल्यानंतर आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, असं अश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Rape on minor